आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ एप्रिल, २०२६

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड

मुंबई (शांताराम गुडेकर ) श्री.संतोष महादेव पटकारे रा.पाचल ता राजापूर जि.रत्नागिरी. सध्या राहणार विलेपार्ले मुंबई यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे. ही निवड मुंबई येथे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेज पटांगणात कै भरत बोडेकर यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले आहे...या प्रसंगी विजय कोकरे राज्य संघटक ऑल इंडिया धनगर गणेश गोरे सुनील गोरे परेश गोरे मारुती झोरे पांडुरंग काळे मनोहर कोकरे पांडुरंग गोरे गणेश शेळके संतोष खुटेकर प्रकाश देसाई संजय झोरे संदीप झोरे इत्यादी उपस्थित होते समाज महासंघ महाराष्ट्र राज्य नवलराज काळे कोकण प्रदेश अध्यक्ष युवा आघाडीचे संतोष पटकारे हे प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महिलांना मदत क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करत असतात गेले १० ते १२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे धनगर समाजाचे प्रत्येक कार्यक्रम ला आवर्जून उपस्थित राहुन सहकार्य करत असतात अशा या सामाजिक नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विकास पाटील सर सेवानिवृत्त

कल्याण:( सुनील इंगळे )जनरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव/मो.ह विद्यालय, ठाणे.चे मुख्याध्यापक/ शिक्षक आघाडीचे राज्य सहसंयोजक, आदरणीय व...