सुग्रास जेवणाचा आनंद घेतल्यानंतर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली.साहित्यिक,कवी, शैक्षणिक, सांस्कृतिक,कला, क्रिडा, सामाजिक, उद्योजक, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत प्रज्ञावंतांना प्रमुख पाहुणे इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान, मानवाधिकार जागतिक मानव कल्याण संस्था पुणे येथील संस्थापिका-अध्यक्षा प्रिती ताई सावंत,भारत विभुषण(गव्हरमेंट ऑफ पंजाब)एमएमआरडीचे स्थापत्य अभियंता डॉ.दिगंबर सिताराम तायडे, अभिनेत्री ए-स्टार टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या संस्थापिका अश्विनी अमित चुरी, जेष्ठ समाजसेविका मेहराजुनिसा अब्दुल शकील, श्री समर्पण ट्रस्टचे जितेंद्र जोशी, आदर्श शिक्षिका नसहत अंजुम इफ्तेकार अन्सारी यांच्या हस्ते पुरस्कार्तींना सन्मानित करण्यात आले.रामजित(जितू) गुप्ता सरांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलखेचक खुमासदार पध्दतीने निवेदिका बीना देवधर यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन, नाष्टा, पाणी, स्वादिष्ट जेवण याची उत्तम व्यवस्था,एसी हाॅल, शिस्तबद्धता,आंनदीमय वातावरण याबद्दल प्रमुख पाहुणे व सर्व पुरस्कर्तींनी राम जित(जितू) गुप्ता सरांचे कौतुक व अभिनंदन केले.
मंगळवार, २१ एप्रिल, २०२६
इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी पायरेसी सेल) मुंबई आयोजित भारत सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) आदर्श व्यक्तिमत्व, निस्वार्थी सेवा, गरिबांचे कैवारी, समाजसेवक हाच धर्म,असे चतुरस्त्र प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे रामजित(जितू) महादेव गुप्ता सर, हे सर्व सामान्यांचे समाजसेवकच.रांजल्या गाजल्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव,त्याच अनुषंगाने कुष्ठरोग पीडित,ऋग्णांच्या मदतीसाठी कल्याण येथील के.एम.अग्रवाल काॅलेज ऑडिटेरियम मध्ये भारत सन्मान पुरस्कार सोहळा२०२६आयोजित करण्यात आला होता.हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.आकर्षक नृत्य, पुरुष, महिलांसाठी मनोरंजनाचे खेळ, गौरी शिळकर हिचे गणपती वंदना,सुधाकर पाटील बुवा यांचे वासुदेव रुपी नृत्य, समता डान्स अकॅडमीच्या मुलांचा जोगवा,रिलस्टार स्वरा मुंढे हिचे कोळी नृत्य, गायिका मौमिता नायर आणि शर्मिला केसरकर याची श्रवणीय गाणी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.सर्व सहभागी कलाकारांना बक्षिसांची लयलूट करता आली.सर्व कलाकारांना ॲंन्टी पायरेसी सेल मुंबई चे मुख्य तपासी अधिकारी राम जित(जितू) गुप्ता यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
कल्याण :(प्रतिनिधी:सुनिल इंगळे )उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे खान्देश भूषण, खान्देश रत्न ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा