आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

म्हाप्रळ कुंभार्ली गावात संत शिरोमणी श्री गोरोबा काका ७०९ वी पुण्यतिथी - भक्ती, एकोपा आणि परंपरेचा भव्य सोहळा ;ग्रामस्थानी राखली संतांची परंपरा कीर्तन आणि हरिमानाचा गजरात सोहळा संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) म्हाप्रळ कुंभार्ली येथे संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व लहान-थोर मंडळींनी या कार्यक्रमासाठी मनापासून परिश्रम घेतले. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात गावातील तसेच मुंबईकर चाकरमानी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
      कार्यक्रमाची सुरुवात काकांच्या पवित्र स्मरणाने व पूजा-अर्चनेने झाली. भजन, कीर्तन, हरिपाठ आणि नामस्मरणाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पालखी सोहळा, दिंडी आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.महिलांनीही उत्साहाने पुढाकार घेत विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.
     भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा सर्वांनी लाभ घेतला. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात भक्ती, एकता आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
गावातील युवकांनी नियोजन, व्यवस्था आणि शिस्त राखण्यात मोलाची भूमिका बजावली. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. या पुण्यतिथी निमित्त गावकऱ्यांमध्ये एकोपा, श्रद्धा आणि समाजभावना अधिक दृढ झाली.अशा पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे संत गोरोबा काकांच्या शिकवणीची आठवण सतत जागृत राहते आणि पुढील पिढीला संस्कारांची अमूल्य देणगी मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

कल्याण :(प्रतिनिधी:सुनिल इंगळे )उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे खान्देश भूषण, खान्देश रत्न ...