आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २० एप्रिल, २०२६

कांदिवली येथे राज्य स्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न!!

मुंबई : समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट व्दारा राज्य स्तरीय विकास रत्न प्रेरणा पुरस्कार २०२६ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न झाला.अक्षय तृतीया रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजलेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृहात सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला.सुरुवातीला प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.व्यासपिठावरील मान्यवरांचा परिचय करून सत्कार करण्यात आले. या वेळी ट्रस्टच्या मिनाक्षी पाखरे यांनी सांगितले की," सुरुवातीला संस्था काढली तेव्हा आम्हाला त्रास झाला पण आम्ही मोठ्या चे स्वागत करुन गरिबांना मदत केली,जीवनाचे सार्थक व्हावे म्हणून गरिबांची सेवा केली, पुरस्कार हे कोणत्याही किंमतीत मोजता येत नाहीत, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, आदिवासी पाड्यात सामाजिक कार्य, गोरं गरिबांना मदत, महिलांसाठी कार्य या वर संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर कार्य करीत असते. 
   "उद्घाटक अलका नाईक यांनी पुढे येण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतात सांगून जिजाऊ माता व इतर कविता सादर केल्या.रामकृष्ण कोळवणकर, अशोक मोहिते, रावसाहेब घोडेराव यांनी मार्गदर्शन केले,तर पोलीस निरीक्षक मंगेश नाईक यांनी २६/११ हल्ल्यातील चित्तथरारक अनुभव सांगितला, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत, गणेश आरती, लावण्या, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा, आणि चित्रपट गाणी, आदी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.शब्दा शब्दावर सामर्थ्य गाजवत संदीप रासकर यांनी उत्कृष्ट, दर्जेदार सूत्रसंचालन केले. स्नेहभोजनानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य रत्न पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.सुनिता क्षीरसागर, आम्ही मुंबईकर चे संपादक प्रमोद सूर्यवंशी, अनिता जाधव,व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना विकास रत्न प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एकंदरीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कांदिवली येथे राज्य स्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न!!

मुंबई : समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट व्दारा राज्य स्तरीय विकास रत्न प्रेरणा पुरस्कार २०२६ विविध सांस्कृतिक कार्यक...