आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १७ मार्च, २०२६

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे २२ मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन

राजापूर:-(प्रमोद तरळ) छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथील दुर्लक्षित नवदुर्ग मुडागडसह प्राचीन शिवमंदिराचे संवर्धन व्हावे. पडसाळी - काजिर्डा घाट‌ रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, पडसाळी लघुपाटबंधारे तलावात बोटींग व्यवस्था व्हावी, राजर्षी शाहू महाराजांनी हत्ती संवर्धनासाठी वापरलेल्या चरांचे संवर्धन, त्यांनी बांधलेल्या अंबाबाई व‌ हनुमान मंदिराचे जिर्णोध्दार, राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरण व परिसराचा पर्यटन विकास व्हावा त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते त्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे म्हणूनच परिसरातील नागरिकांना एकत्रित करुन रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी मुडागड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे 
    सदर महोत्सवाचै आयोजन मुडागड महोत्सव समिती पडसाळी - काजिर्डा घाट रस्ता कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून दि. २२ रोजी स.७ वा. मुडागडावर श्रमदान, दु. ४ नंतर शोभा यात्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, शिवपालखीचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम (पोवाडा, लेझीम, मर्दानी खेळ), महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि सायं ७ वा. महाप्रसाद होणार आहे तरी शिवप्रेमी,गड प्रेमींनी या मुडागड महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

ओणी:-(प्रमोद तरळ) जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन २०२५-२६ साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा यातून राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीवळे गो...