मुंबई:-(प्रमोद तरळ) झी ५ मराठी या वाहिनीवर सध्या 'देवखेळ' नावाची सिरीज सुरु असून संकासुर या देवाला अंधश्रध्देशी जोडून तमाम कोकणवासीयांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली आहे.
कोकणकरांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सत्य कथेला गवसणी घालणारे, कोकणच्या लोकसंस्कृतीचा खरा वारसा सांगणारे नवे कोरे गीत "गाथा देव संकासुराची गायली" हे गीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सप्तरंगी संगीत जीवन या युट्यूब चॅनलवरुन प्रदर्शित होणार आहे या गीताची संकल्पना सचिन कुरटे यांची असून डिटीपी/ पोस्टर डिझाईन नरेश मोरे यांची आहे , तर या गाण्याचे गीतकार/गायक सुनिल शिवराम घेवडे आहेत. कलामंच आधार स्तंभ गणेश गोविंद घेवडे असून सप्तरंगीचे शिलेदार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हे गीत जास्तीत जास्त कोकणकरांनी पहावे असे आवाहन सप्तरंगी संगीत जीवन या युट्यूब चॅनेलने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा