आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १७ मार्च, २०२६

कोकणच्या नमन लोककलेत 'राजापूरची राधा' म्हणून प्रसिद्धीस आलेल्या सायली भिंगेच्या अभिनयाची रसिक प्रेक्षकांना भुरळ

राजापूर:-(प्रमोद तरळ) श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई ( भालावली -राजापूर) यांच्या यंदा कोकणदौरा निमित्ताने दापोली, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, गुहागर, पाली आणि वैभववाडी या तालुक्यात लोकप्रिय नमनाचे कार्यक्रम होत आहेत. आता होणारे कार्यक्रम गुरुवार दि. ०२ एप्रिल २०२६ , तळवडे (राजापूर), शनिवार दि. ०९ मे २०२६, दापोली, रत्नागिरी, मंगळवार दि. १२ मे २०२६ भालावली (राजापूर) तसेच मे महिन्यातील सार्वजनिक कार्यक्रमात यांचे नमन हमखास ठेवले जातात. रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव यंदा एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश कार्यक्रम हे कोकणातच आहेत. कार्यक्रमाचे खास वैशिट्य म्हणजे "राजापूरची राधा" सायली भिंगे हिचा अभिनय पाहण्यास रसिक प्रेक्षक उत्सुक असतात तसेच प्रसार माध्यमातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे श्रीकृष्णाच्या भूमिकेत असणारे कु. पंकज कदम त्याचबरोबर संचिता सूद, शामल धायलकर, पायल दुर्गवळी, मनस्वी गुरव , श्रावणी सावंत आणि अदिती गोनबरे या नृत्यांगनांचे नृत्य तसेच छोटी गौळण हिर्षा गुरव आणि दिव्यांशी शेंडेकर या केवळ ४ ते ६ वर्षाच्या असून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यांचा सुद्धा तेवढाच सहभाग असतो. विनोदी कलाकार साईराज सकपाळ, दीपेश भोवड , नितीन प्रभू हे देखील तेवढ्याच ताकदीने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तसेच "जेव्हा येतो राजा, तेव्हाच येते मजा" म्हणजे अष्टपैलू कलाकार श्री. अंकित तळेकर यांची अफलातून भूमिका पाहण्यास रसिक प्रेक्षक अगदी शेवटपर्यंत कार्यक्रमाची मजा घेतात. 
तसेच सुमधुर आवाजाची गायिका मोनिका चव्हाण तसेच नवोदित गायिका सौ. आर्या गुरव तसेच गायक रवी सूद, सुयोग्य जोशी, श्रीपाद भोवड आणि इतर सहकारी यांची अदाकारी सुद्धा पाहण्याजोगे असते. लेखक / गीतकार : श्री. महेंद्र जोशी , दिगदर्शक : श्री. सचिन सांडये तसेच अध्यक्ष : भरत गुरव, उपाध्यक्ष- दीपक सांडये, सल्लागार - सचिन शेंडेकर, सुजित जोशी, आणि इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम कोकणात सादर केला जातो. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री. विशाल गुरव आणि श्री. योगेश विखापे यांच्या मार्गदर्शनाने केले जाते. असे कलामंचचे सुत्रधार आणि सेक्रेटरी श्री विश्वास गुरव यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

ओणी:-(प्रमोद तरळ) जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन २०२५-२६ साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा यातून राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीवळे गो...