आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १७ मार्च, २०२६

रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

लांजा:- (प्रमोद तरळ) सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, रिंगणे संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे या प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
‌. सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने दुर्गम भागात वसलेल्या रिंगणे व आजुबाजूच्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी ९ जून १९६९ मध्ये प्रशालेची स्थापना केली सध्या येथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत‌. 
        या शाळेची सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष,ई लर्निग सुविधा, निर्माण क्रिडा विषयक प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, कौशल्याभिमुख शिक्षण आदी खास वैशिष्ट्ये असून या शाळेला उज्वल निकालाची परंपरा असून गतवर्षीचा‌ १२ वीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे 
     "बारावीपर्यंत शिक्षणाची हमी, रिंगणे हायस्कूलमध्ये कशाची नाही कमी" या उक्तीप्रमाणे आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी रिंगणे हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक श्री बी.एस.पाटील सर ९४२११८९२१८, श्री संतोष कांबळे सर - ९४२०८४३६४७, श्री दिपक आयरे सर - ९४०५५०८२१३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

ओणी:-(प्रमोद तरळ) जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन २०२५-२६ साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा यातून राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीवळे गो...