वावे – अलिबाग ( प्रतिनिधी –दिनेश तुरे ) :- सालाबादप्रमाणे मुक्काम -वावे , तालुका- अलिबाग , जिल्हा –रायगड, येथे चैत्र शु .९ , श्री शालिवाहन शके १९४८ , गुरुवार दिनांक - २६ मार्च २०२६ रोजी ७७ व्या श्रीरामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, सकाळी ९.०० वाजता श्रीरामप्रासादिक भजन मंडळ वावे : बुवा - श्री बळीराम गावंड ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) तसेच मृदंगमणी – श्री हरिश्चंद्र नथुराम गावंड , श्री दामोदर गावंड , श्री जनार्दन गावंड ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) , चालक श्री दिलीप पाटील , श्री संदीप गायकर , मॅनेजर श्री वसंत गावंड यांचे सुश्राव्य भजन होणार आहे . श्रीरामप्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी - १०.०० ते १२.३० यावेळेत होणार आहे. श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२.३० वाजता मर्यादापुरुषोत्तम श्रीरामप्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावे संपन्न होणार आहे. तसेच भक्तजनांसाठी महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १ .०० ते ४.०० यावेळेत असणार आहे. तसेच भक्तजनांच्या मनोजनार्थ पंचक्रोशीतील : बेलोशी, महाजने , आंदोशी, उसर , वळवली , आंबेपूर , या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी १ ते रात्रौ ७ यावेळेत होणार आहेत , त्यामुळे भक्तजनांना संगीतमय मधुर स्वरांचा आनंदमय आस्वाद मिळणार आहे . श्रीरामप्रभूंची पालखी रात्रौ ९.०० वाजता विविध सजावटीने सजविलेला श्रीरामरथ चलचित्र पालखी सोहळा सोबत देवेश बेंजोपथक वावे , शिवबा म्युझिकल ग्रुप फणसापुर, यांच्या वाद्य व म्युझिकचा नयनरम्य आस्वाद, तसेच विभागातील ताशापथक हरिश्चंद्र सांदणकर ,आत्माराम थळे, व इतर मित्रमंडळी यांचा ताशांचा सुंदर स्वर घुमणार आहे आणि पालखीसोबत वावे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील आंदोशी, चिंचोटी , घोटवडे , बेलोशी , महाजने, या लेझीम पथकांची रंगत पहायला मिळणार आहे, अशी भव्य पालखी मिरवणुक गावातुन काढण्यात येणार आहे. पालखीसोबत : बोरपाडा , कुंठयाची गोठी, आंदोशी , बेलोशी , महाजने, या पंचक्रोशीतील व गावातील टाळमृदूंगधारी वारकरीभजने व भावगीते होणार आहेत . डेकोरेशन व ध्वनी : गावदेवी साउंड सर्वीस व डेकोरेटर आंदोशी यांचे आहे . वेशभूषा – स्वराली ड्रेसेस थेरोंडा सौ . विनोदिनी कोंडे व रंगभूषा –महेंद्र गावंड यांची असणार आहे . तसेच वेषभुषाधारक भाविक ग्रामस्थ हे श्रीरामप्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. श्रीरामप्रभूंच्या पालखीसोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात , तसेच जय हनुमान लाठीकाठी आखाडा भोनंग यांचे , लाठी - काठी व मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके श्रीराम मंदिराच्या प्रांगणात दाखविण्यात येणार आहेत. आकर्षक व मनमोहक रोषणाईने श्रीराममंदिर उजळून निघणार आहे. टाळमृदूंगाच्या नादात भक्तीमय वातावरणात या अविस्मरणीय अशा श्रीरामप्रभुंच्या भक्तिमय आनंद जन्मोत्सव सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा तसेच महाप्रसादाचा लाभ सर्वभाविकांनी घ्यावा व याचीदेही ,याची डोळा अशा या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी द्विगुणीत करावा असे आवाहन वावे ग्रामस्थांच्यावतीने : श्री दिनेश हरिश्चंद्र तुरे ( मुक्त - पत्रकार व वृत्तपत्रलेखक ) यांनी केले आहे. तसेच नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी रात्रौ १०.०० वाजता “ दिल्या घरी सुखी रहा.....“ या दोन अंकी सामाजिक व कौटुंबिक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अशा प्रकारे यादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वावे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे . श्रीरामप्रभुंच्या चरणी नतमस्तक होऊन अलोट भक्ती द्वारे या मंगलमय भक्तीमय सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी लुटूया ! एक ही नारा जय श्रीराम ! एकही नाम जय श्रीरामप्रभु ! श्रीराम जय राम ! जय जय राम !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे साहेब यांचे निर्देश
मंत्री नितेश राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक संपन्न मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) वर्सोवा-वांद्र...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा