आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

कुपर रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड ; डिस्चार्ज मिळविण्यासाठी करावी लागते पायपीट

मुंबई (उदय वाघवणकर) - कुपर रुग्णालयात उपचार घेतलेल्या जोगेश्वरीतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये रहात असलेल्या शमिका चव्हाण नामक रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर देवदास सुधाकर शेट्टी यांसोबत रुग्णालयाच्या विविध समस्यांवर चर्चा केली.यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना जे काही अनुभव आले ते भयानक तर होतेच त्यापूढे जाऊन सांगायचे तर रुग्णाला दिल्या जाणार्‍या डिस्चार्ज पेपरची पूर्तता करण्यासाठी ते पेपर हे पीडीएफ द्वारे पाठवुन बाहेरील झेरॉक्स दुकानातुन त्याची प्रिंट घ्यायची व नंतरच डिस्चार्ज होणार.कूपर हॉस्पिटल सारख्या नामवंत पब्लिक/सरकारी धर्मादाय तत्त्वावर चालणारे रुग्णालय त्यात असे प्रकार होत असतील तर ते त्वरित थांबले पाहिजेत.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ देवदास सुधाकर शेट्टी यांनी या बाबत संबंधित माहिती घेऊ व त्यावर त्वरित कार्यवाही करु असे आश्वासन दिले.याबाबत बाबूभाई पिल्ले,रमाकांत नर,योगेश रेळे,राजेंद्र शिंत्रे,सदानंद मांजरेकर यांनी आवाज उठवला असून रुग्णालयातील समस्यांची पोलखोल केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सामाजिक विचार मंच आयोजित व्याख्यानमालेचे आयोजन

भांडुप - कांजूरमार्ग -भांडुप (पुर्व) येथील सामाजिक विचार मंचातर्फे वैचारिक अशा व्याख्यानमालेचे आयोजन दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालाव...