कल्याण ( सुनील इंगळे ): लेवा स्पोर्ट्स क्लब अंबरनाथ मार्फत लेवा प्रीमियम लीग तसेच लेवा युनिटी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लेवा पाटीदार समाज मंडळाच्या विविध शहरातील विविध संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, त्या अंतर्गत अंबरनाथच्या तीन टीम, बदलापूर, जळगाव,कल्याण, उल्हासनगरच्या प्रत्येकी दोन-दोन अशा संघांनी सहभाग नोंदवला होता.लेवा पाटीदार समाज कल्याण मंडळातर्फे या स्पर्धेत सरदार इलेव्हन संघाने विजय नोंदवून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला,अगदी अटीतटीच्या फेरीत सरदार इलेव्हन संघाने आपली दिमागदार कामगिरी कायम ठेवत उल्हासनगर संघाचा प्रभाव करत आपले नाव या चषकावर कोरले. यशस्वी सरदार इलेव्हन संघाचे खेळाडू पुढील प्रमाणे कर्णधार अंकित झोपे, निखिल इंगळे,पंकज जावळे,लुकेश भिरूड, शैलेश चौधरी,रोशन,गिरीश भारंबे,रितेश सरोदे,शुभम चौधरी,कुणाल झोपे या वीरांनी सरदार इलेव्हन संघाचा गड लढून अंतिम विजय प्राप्त केला त्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करून या गौरवशाली आयोजनाची सांगता झाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारा उपक्रम
मुंबई(शांताराम गुडेकर ) : देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी क...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा