आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

नामांकित खाजगी शाळेत प्रवेशाकरिता शासनाचे व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी वर्गाचा खाजगी शाळाप्रशासनावर दबाव त्यामुळे गुणवत्ताधारक गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

शिक्षण मंत्री महोदयांनी लक्ष घालावे ; शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर                                     
प्रतिनिधी : मुंबईमध्ये अनेक खाजगी नामांकित शाळा असून त्या शाळेमध्ये ज्यु. के.जी ते आठवीपर्यंत विविध वर्गात प्रवेश घेऊन देणारे एक रॅकेट मुंबईत कार्यरत झाले आहे. त्या रॅकेट मधील स्वयंघोषित समाजसेवक शिक्षण मंत्री, महापौर, प्रधान सचिव, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक, यांच्या शिफारस पत्राचा वापर करत आहेत. व त्याच्या किंवा त्याच्या कार्यालयामार्फत खाजगी शाळाप्रशासनावर दबाव आणून वेळप्रसंगी ब्लॅकमेल करून प्रवेश घेण्याचा व्यवसाय सुरू आहे. 
      मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी अधिक सरसावले आहेत. याबाबत शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना लेखी तक्रार करून लक्ष वेधले आहे. अनेक खाजगी शाळा प्रशासन त्रस्त झाले आहे याबाबत श्री रमेश खानविलकर म्हणाले की, अनेक श्रीमंत व्यावसायिक, प्रवेश इच्छुक सामाजिक नेते, लोकप्रतिनिधी, या रॅकेट मधील काही स्वयंघोषित समाजसेवकांना प्रवेशाकरिता शिफारस पत्र देतात त्या पत्राच्या आधारे रॅकेट मधील स्वयंघोषित समाजसेवक शाळेत जाऊन मुख्याध्यापक, संचालक, विश्वस्त, यांना धमकवून प्रवेश घेतात. काही ठिकाणी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक, शिक्षण निरीक्षक मंत्रालयातील अधिकारी संस्था शिक्षण संस्था संचालकांना धमकावून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे मुळात त्यांनी प्रवेशाकरिता पत्र देणे किंवा दबाव आणून प्रवेशा करिता शिफारस पत्र देणे नियमबाह्य आहे भ्रष्टाचार पूरक कार्यप्रणालीतील येणारी कृती. याबाबत यापूर्वी काही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात देखील गेलेली आहेत . 
      महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेने याबाबत यापूर्वी शासन परिपत्रके व निर्देश काढून अधिकाऱ्यांनी शालेय प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये असे निर्देश अनेक वेळा दिलेले असून, शासनाच्या व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी शासन निर्देश जुमानत नाही रमेश खानविलकर यांनी आवाहन केले आहे की , खाजगी संस्थाचालकानी अशा दबाव आणण्याचा कोणी अधिकारी किवा स्वयंघोषित समाजसेवक प्रयत्न करत असेल तर लगेच पोलिस तक्रार करावी . ज्यु. के.जी ते ते आठवीच्या प्रवेशा करिता काही जण थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव ,पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, मनपा उपआयुक्त यांच्याकडे जाऊन शिफारस पत्र घेतात किंवा त्याच्याकडून त्याच्या पी.ए कडून संस्था चालकांना प्रवेश द्या असा आग्रह धरतात ही बाब गुणवत्ताधारक विद्यार्थिवर गोरगरीबावर अन्यायकारक आहे. घाटकोपर मध्ये एका शाळेने दबाव जुमानला नाही तेव्हा एन विभागातील बिल्डिंग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने शाळा तोडण्याची धमकी दिली ही बाब गंभीर आहे. असे ही शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर म्हणाले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारा उपक्रम

मुंबई(शांताराम गुडेकर ) : देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी क...