आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

झोपडी धारकांना न्याय कसा मिळणार ?झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ९०३८ व अन्य न्यायालयात ५७८२ खटले प्रलंबित

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागात गेल्या उन्हाळी अधिवेशनात गेली ९/१० वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांविरोधात अनेक आमदाराने लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले होते तेव्हा सरकारने चौकशी करून कारवाईबाबत आश्वासन देखील दिले होते पण त्या आश्वासनाचे पालन झाले नाही. आजही अनेक अधिकारी ९/१० वर्षे पासून कार्यरत आहेत.श्री मिटकर,संध्या बावणकुळे, पवार, अमोल साळुंखे, तनपुरे सारखे अनेक अधिकारी आपली जागा सोडत नाहीत.  
        संजय देशमुख ९ वर्षानंतर निवृत्ती होऊन ही पुनः झोपूप्रा मध्ये महेंद्र कल्याणकर यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीने रुजू झाले. कोणालाही झोपूप्रा सोडत नाही.   मुंबईत अनेक झोपूप्राचे प्रकल्प अशा अधिकाऱ्यांच्या चुकीचे व वेळ काढू पणाच्या धोरणामुळे रखडलेले आहेत अनेक झोपडीधारक एस. आर. ए. च्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन करून तक्रारी करत आहेत.सामान्य झोपडीधारकाना छोट्या छोट्या तक्रारी साठी हेच अधिकारी काम न करता कोर्टातून ऑर्डर आणण्याचे मार्गदर्शन करतात. 
 झोपूप्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर बिल्डर्स व्यतिरिक्त कोणालाही भेटत नाहीत शासनाचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांचे लेखी आदेश २/२ वर्ष पाळत नाही. शासनाच्या पत्रानुसार कोणताही सत्य अहवाल शासनास देत नाहीत. 
          माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश खानविलकर यांनी झोपूप्रा कार्यालयातील प्रलंबित घटनेची माहिती घेतली असता जमाअ श्रुती शिंगरे यांनी झोपूप्रा मुवीस/कार्या-२/टे-२ शामाअ/ SRA/20054050 /103/123/2025 अन्वये श्री रमेश खानविलकर यांना माहिती दिली की, मुंबई उच्च न्यायालयात झोपूप्रा मुंबई यांच्या विरोधात ९०३८ ,शहर दिवाणी न्यायालयात ४०१८ इतर न्यायालयात १७६४ एवढे खटले प्रलंबित आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारा उपक्रम

मुंबई(शांताराम गुडेकर ) : देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी क...