आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

युवा प्रतिष्ठान रायगडच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या बिल्ल्याचे प्रमोद सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी :रायगड युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धांचे नालासोपारा येथे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी महाराष्ट्रात प्रथमच २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या बिल्ल्याचे प्रकाशन करण्यात आले होते. रायगड युवा प्रतिष्ठान सामाजिक क्षेत्रात सक्रीय असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण उपक्रम व रक्तदान शिबिर, विद्यार्थांसाठी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असते. सदर क्रिकेट स्पर्धेला महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार आदिती तटकरे, सुजित तांदळेकर, समाजसेवक विवेक पवार, विरार शहर प्रमुख बाबुराव चोरगे, माजी सभापती डॉ. अनिकेत कदम, व योगेश रायगावळी, अक्षय राऊत, मयूर गजमल, युवा प्रतिष्ठान रायगड चे संस्थापक अमर खेरटकर, अध्यक्ष - गणेश निर्मळ, क्रिकेट सामन्यांचे गणेश शिंदे, उपाध्यक्ष - मयूर शिगवण, संघटक प्रमुख विभाग संघटक विशाल सावंत सतीश चोरगे क्रिकेट सामन्याचे अमित पवार पंच मॅनेजमेंट निशा शिगवण सल्लागार नितेश बोर्ले , श्रीवर्धन संघटक सचिन जाधव , संपर्कप्रमुख संजय कोमनाक सह संपर्कप्रमुख शैलेश पवार , सतीश शिर्के, विशेष सहकार्य मंगेश हुमणे, रायगड मी मराठी प्रतिष्ठान चे वसई विरार सचिव- अमोल चिमण, राजे प्रतिष्ठान रायगड चे संपर्कप्रमुख - महेश शेडगे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश जोष्टे, अनंत सावंत, राकेश कासरुंग, संदीप पवार, सुशांत पवार, व सर्व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी, स्थानिक मुंबई गाव मंडळ पदाधिकारी व मुंबई क्रिकेट संघटना उपस्थित राहून शोभा वाढवली. मराठी भाषा गौरव दिनाच्या बिल्ल्याचे प्रकाशन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, संगीतकार, दिग्दर्शक , सामाजिक लघु चित्रपटकार, साप्ताहिक आम्ही मुंबईकर संपादक प्रमोद सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ह्यावेळी प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारा उपक्रम

मुंबई(शांताराम गुडेकर ) : देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पुढाकारातून ओएनजीसी आणि ऑल इंडिया एससी/एसटी क...