भांडुप - कांजूरमार्ग -भांडुप (पुर्व) येथील सामाजिक विचार मंचातर्फे वैचारिक अशा व्याख्यानमालेचे आयोजन दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सायं. ६:३० वा. गणेश मंदिर, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व), मुंबई याठिकाणी करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या सार्थ शताब्दीचा मुहूर्त साधून २०१३ या वर्षापासून या व्याख्यानमालेस सुरुवात झाली.सालाबादप्रमाणे याहीवर्षी कांजूरमार्ग (पूर्व) येथे तीन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.
शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्रौ ७.०० वा. व्याख्यात्या डॉ. आसावरी बापट या युगप्रवर्तक आर्य चाणक्य विषयावर पहिले पुष्प गुंफतील. तर दि. २८ फेब्रुवारी रोजी व्याख्याते श्री. संजय वझरेकर भारतीय संस्कृतीवर परकियांचे आक्रमण या विषयावर दुसरे आणि १ मार्च रोजी वंदे मातरम् सार्ध शताब्दी अन्वयार्थ या विषयावर व्याख्याते श्री. अनिल देशमुख तिसरे पुष्प गुंफणार आहेत.
विशेषतः मागील दोन वर्षांपासून कांजूर-भांडुप (पूर्व) परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील मंचातर्फे केले जाते. या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षिस समारंभ शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तेव्हा या वैचारिक सुवर्णसंधीचा परिसरातील जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच इच्छुक दात्यांनी मंडळास स्वेच्छेने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक विचार मंच कार्यकारणी मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क श्री. बाळशिराम धी. गाडगे,अध्यक्ष ९९८७३०२५७२, श्री. संतोष न. पासलकर सचिव ९८२१७६१४९६.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा