आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथे आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर संपन्न

स्वाभिमानी पक्ष,डब्ल्यू.एच.आर.एफ.आणि खादी ग्रामोद्योग विलेज इंडस्ट्रियल कमिशन भारत सरकार यांचे लाभले सहकार्य 
मुंबई (शांताराम गुडेकर ) स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.मा.खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने व मुंबई प्रदेशाध्यक्ष मोहन वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष,डब्ल्यू.एच.आर.एफ.आणि खादी ग्रामोद्योग विलेज इंडस्ट्रियल कमिशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथील रंकोळ या ठिकाणी दि.१५/०२/२०२६ रोजी आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर पार पडले.या शिबिरास स्थानिक आदिवासी महिलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक ईश्वरचंद्र जी.कृषी अधिकारी व प्रशिक्षक प्रशांत गावडे,रंकोळच्या सरपंच सौ.वनिता करमोडा,उपसरपंच मुलचंद बोलाढा,विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सिक्कीम करमोडा, किरण बोडके,अरविंद गुरव,क्रिस्टिनो स्वामीनाथन
महेश व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....