आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ. सविता माई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष समारंभाचे जानवळे येथे आयोजन करण्यात आला होता, समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कु. पुनम संजय मोहिते हिचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुनम हिने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करून परिसराचे नाव उंचावले असून तिच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला.
    कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येत आपली ओळख निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग यावरही चर्चासत्र घेण्यात आले.
      महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक, मान्यवर आणि सहभागींचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....