प्रतिनिधी : अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन व सॅमसंग सेमीकंडक्टर वतीने जिज्ञासा २०२६चे चोंडे फॉर्म पुणे येथे उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो कराड- चाटे मॅडम,प्रोफेसर एमआयटी पुणे, डॉ.शशी भूषण सिंग आऊटस्टँडिंग सायंटिस्ट अँड एक्स डायरेक्टर ऑफ डीआरडीओ, श्री नितीन देसाई सीईओ नवम इनोवेशन फाउंडेशन, श्री मनीषचंद्र जोशी डायरेक्टर सेल लायब्ररी चीफ डिझाईन सॅमसंग इंडिया रिसर्च, श्री हरीहरण गणेशन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पार्टनर रिलेशन अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन उपस्थित होते.हरिहरन गणेशन यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि यात त्यांनी अगस्त्या कशा प्रकारे कार्य करते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सॅमसंग सेमी कंडक्टर इंडिया रिसर्च फाउंडेशनचे सहकार्याबद्दल आभार मानले.मुलांमध्ये जीज्ञासा कशी वाढवता येईल त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा वापर अगस्त्या करत आहे याविषयी मार्गदर्शन केले. पारंपारिक पद्धतीचे शिक्षण आणि अगस्त्या वापरत असलेली शिक्षण पद्धती यातील तफावत आणि उपयोग त्यांनी सांगितला. शिक्षणाचे गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि त्याचा मानवी मूल्यांमध्ये कसा उपयोग होईल याबाबत हे त्यांनी मार्गदर्शन केले.
नितीन देसाई यांनी जिज्ञासा 2009 सालीस सुरुवात झाली आणि तेव्हापासून चा इतिहास सांगितला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस फक्त पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये त्याची सुरुवात झाली होती त्याचबरोबर अगस्त्याचे लर्निंग बिहेवियर याबाबतही मार्गदर्शन केले. शशी भूषण सिंग सर यांनी जिज्ञासा चा जन्म कसा होतो आयक्यू म्हणजे काय त्याचबरोबर विविध वैज्ञानिकांबाबतच्या गोष्टी सांगून मुलांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर डेली डायरीमध्ये आपण दिवसभराच्या विविध घटनांचा उल्लेख करतो परंतु त्यांनी सांगितले की डेली डायरीमध्ये आपण कोणत्या गोष्टीमध्ये चुका केल्यात त्या लिहाव्यात. संघर्ष ही नवीन शिकण्याचे सुरुवात असते त्यातूनच आपल्याला आपला विकास करण्याची संधी उपलब्ध होते. स्वाती कराड चाटे मॅडम यांनी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन करीत असलेल्या कामाचे कौतुक केले त्याचप्रमाणे भारतात चालत आलेली गुरुकुल सिस्टीम कशाप्रकारे समस्या निवारण करण्यासाठी उपयुक्त होते त्याबाबतही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध विकसित देशांमध्ये जे बदल दिसतात त्याचे चांगले बदल आपल्या देशातही त्याचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चिरंतर विकासासाठी आपल्याला बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर एमआयटी युनिव्हर्सिटी करीत असलेल्या शैक्षणिक कामाबाबत आहे माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते जी इतिहासाचे उद्घाटन करण्यात आले समारोप कार्यक्रम १८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा