राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेडचे नवनिर्वाचित अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री. शिवकुमार सुब्रमणीयम यांची दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी उपरोक्त पदावर नियुक्ती झाली. त्या प्रित्यर्थ आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमच्या वतीने त्यांचे कंपनीच्या आर्क गेस्ट हाऊस च्या सभागृहामध्ये शाल, गुच्छ, स्वीट देऊन, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अभिनंदन करण्यात आले. सन्मानपूर्वक त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी व्ही. डी. पाटील, डी. टी. बारकुंड, प्रभाकरराव साळुंखे, दीपक सालवणकर, प्रसाद अनावकर, आर्. एस. येवलेकर, सुशील काकू, सुभाष हांडे देशमुख आदी फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. शिवकुमार सुब्रमणीयम यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अधिक प्रगतीच्या मार्गावर जाईल, या विश्वासाने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत व हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील कार्यकाळास उज्ज्वल यश लाभो अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
फोरमचे पदाधिकारी श्री. सुशील काकू यांचा वाढदिवस नुकताच झाला, त्यानिमित्ताने त्यांचाही गुच्छ देऊन प्रसंगी सत्कार करण्यात आला. अभिष्टचिंतन करण्यात आले.
धन्यवाद.
सुभाष हांडे देशमुख, सचिव
आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा