हा पुरस्कार Indian Literature & Arts Society या संस्थेमार्फत प्रदान केला जातो. सदर संस्था भारत सरकारच्या Ministry of Corporate Affairs (MCA) अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे पुरस्कारास अधिकृत व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त आहे. त्यामुळे या सन्मानाची विश्वासार्हता व पारदर्शकता अधोरेखित होते.
पुरस्कार प्रदान व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री. राजेंद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या संगीत, संस्कृती आणि कला संवर्धनातील योगदानाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.अवॉर्ड प्रदान व सत्कार प्रसंगी संपादक, डॉ. श्री. निलेश अनभावणे
गुरुवर्य श्री. रामदास बुवा पाटील (नेरुळकर)
श्री. गिरीधर मारुती पाटील, मा. सरपंच, निळजे
श्री. नामदेव पाटील श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे व्यवस्थापक श्री. जयवंत म्हात्रे
संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. राजेंद्र पाटील यांच्या कार्याचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Indian Literature Award 2026 हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून कला व संस्कृती क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण ठरला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा