आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

पेण ग्रोथ सेंटर नेमके काय?

  शहरासाठी औद्योगिक प्रकल्प,नवी मुंबई,मुंबई या शहरावरील ताण कमी करण्यासाठीच या केंद्राची स्थापना, औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे हा उद्देश,रोजगार निर्मिती, MMRDA साठी अनुकूल वातावरण, औद्योगिक झोन,मध्यम,मोठे ,तयार करणे,लॉजिस्टिक पार्क,गोदामे,कामगार वसाहती,निवासी प्रकल्प,रस्ते,रेल्वे जोडणी,शाळा,रुग्णालये, व्यावसायिक सुविधा, यातून स्वतंत्र आकर्षक नवीन शहर निर्मिती.वीज इंटरनेट मोठ्याप्रमाणावर सुविधा निर्माण करणे.
     हे सर्व कागदावर सुंदर दिसते,मात्र यासाठी १० ते १५ वर्षांपर्यंत वाट पहावी लागेल,हे आशादायी चित्र तयार व्हायला.
    पेण ग्रोथ सेंटर यातून सरकारला थेट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील
 (१) पेण ग्रोथ सेंटरचा अधिकृत नकाशा, गट क्रमांक, अधिकृत जमीन क्षेत्र,आजतागायत जाहीर का केले नाही?
   (२) जमीन अधिग्रहण करताना शेतकरी,ग्रामसभा,स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतली आहे का?घेतली असेल तर ती कागद पत्रे जाहीर करावी.
 (३) या ग्रोथ सेंटर मुळे किती नागरिक विस्थापित होणार आहेत,त्यांच्या पुनर्वसनाची योजना कोठे आहे?
(४) पेण खारे पाट विभागात सात दिवसातून एकदा पाणी मिळत असताना या सेंटरसाठी पाण्याची व्यवस्था कोणती आहे.?नवीन जलस्त्रोत कोणता आहे.ते जाहीर केले गेले आहे का?
(५) पर्यावरण परिणाम अहवाल(EIA) तयार झाला आहे काय?,तयार झाला असेल तर जनतेसाठी खुला का केला नाही?
(६) कोणत्या उद्योगांना मंजुरी दिली आहे,ते प्रदूषणकारी आहेत का? याची हमी काय?
(७) या ग्रोथ सेंटरमध्ये स्थानिकांना रोजगार किती टक्के मिळेल याची हमी मिळत का?त्या बाबत सरकारी आदेश केव्हा निघणार
 (८)ग्रामपंचायत,नगरपालिका, पंचायत समिती यांना निर्णय प्रक्रियेत डावलण्याचे कारण काय?
(९)CSR निधीतून पेण तालुक्याची पाणी,आरोग्य,शिक्षण,रस्ते यासाठी किती निधी राखीव आहे,याची रुपरेषा कोठे आहे?
(१०) ग्रोथ सेंटरचा माहिती जनतेला न देता हा प्रकल्प पुढे रेटण्याचा मतितार्थ कोणता आहे?सरकार पारदर्शकतेला घाबरतय का?
लोकांना विश्वासात न घेता,लोकशाही प्रक्रियेविना हा ग्रोथ सेंटर पुढे नेटाने नेणे योग्य आहे का?हा अधिकार सरकारला कोणी दिला?
 वरील सर्व प्रश्नाची समाधानकारक उत्तरे लोकांना देऊन...या प्रकल्पाचे बस्तान बसवावे लागेल.
 शेतकरी भूमिहीन होणार,गावे नाहीशी होणार,कुटुंब व्यवस्था,समाजव्यवस्था, नातीगोती संपणार..येथे मात्र गगनचुंबी इमारती , उभ्या राहतील आणि तेथे पहारेकरी हेच शेतकरी राहत असतील तर हा विकास काय कामाचा..


-चंद्रकांत म्हात्रे (सर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

धनश्री चेस अकॅडमीचा बाल बुद्धिबळपटू स्मित लोकेने रचला इतिहास; ५/५ च्या परिपूर्ण गुणांसह पटकावले ८ वर्षांखालील गटाचे (Under-8) विजेतेपद

मुंबई: आपल्या अप्रतिम रणनीती, बुद्धीचा कस आणि कमालीच्या संयमाचे प्रदर्शन करत, युवा बुद्धिबळपटू स्मित लोके याने प्रतिष्ठित ईबीडी ...