रोजगार मेळावे, परराज्यात पर्यटन, शेतीवर संशोधन,व्यवसायाचे तंत्र,व्यवसाय मार्गदर्शन,
बाजार पेठांचा शोध,शहरांच्या गरजा,
नियोजन.....
काही दिवसांपूर्वी मी एक मेसेज टाकला होता. मुलांना नोकरी नको धंदा शिकवा...... शिक्षण घेताना ते उत्तम दर्जाचे घेण्याची गरज आहे.
समाजाला सुविधा तर मिळाल्याच पाहिजे पण तरुणांना उदर निर्वाहासाठी उद्योगाचे प्रशिक्षण द्यायला हवेत. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्याला मुंबईची बाजारपेठ जवळ आहे. आपल्या मुलांनी जर पशुपालन, मत्स्य व्यवसाय, शेती पूरक व्यवसाय केले तर आपल्या जमिनी शाबुत राहतील. धनाढ्यांची वक्रदृष्टी तिच्यावर पडणार नाही. त्या करीता मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. तरुणांनी दुसऱ्या राज्यात जाऊन प्रशिक्षण घेतले पाहिजे. माणसाला जीवन जगण्यासाठी कोणत्याही कृत्रिम ज्ञानाची आवश्यकता असतेच असे नाही. आपल्या आई वडिलांचे व्यवसाय मूल आत्मसात करत असतात. पारंपरिक व्यवसायाला विस्तृत स्वरूप देण्याची वेळ आली आहे. असे आवाहन मी करू इच्छितो. जर आपल्या तरुणाईने शेती व्यवसाय सुरु केले तर कोणीही आपल्या शेतीवर नजर टाकू शकणार नाही.
मी स्वतः शेती पूरक व्यवसाय करू इच्छित आहे. फक्त आपण सर्वजण एकत्र येण्याची गरज आहे. हिम्मत प्रत्येकात आहे, मात्र धाडस करावे लागेल, काहीच न करता आपण फक्त पहात राहिलो तर राजकारणी लोक त्यांच्या संकुचित वृत्तीने आपल्या या सुवर्ण भूमीचा घास घेतील..... नदीजोड प्रकल्प योजना राबवली तर महाराष्ट्रात पाणी टंचाई भासणार नाही. शेतीवर प्रयोग केले जात नाहीत. इझ्राइल देशात ना, पाणी ना माती किती प्रतिकूल परिस्थितीत येथील लोक जगत असतील. तरी सुद्धा तेथील अन्नधान्याच्या जगाच्या बाजारात विकत आहेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. आपल्याला जे मिळालं आहे त्याच सोन करूया...
आपला तरुण नोकरी करण्यासाठी बाहेर पडू लागला आहे. अरे भविष्यात खाणार काय? आज लोकांना शुद्ध केमिकल फ्री आणि ताजे अन्न हवे आहे, त्याचा पुरवठा आपण करू शकतो का? छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठ भांडवल लागत नाही. उत्तर भारतातून येणाऱ्या तरुणांना पहा पाणीपुरी, बर्फाचा गोळा, फळ, भाजीपाला, खेळणी इत्यादी विकून पैसे कमवतात. आपली माणसं कुठे कमी पडतात, तर ती लाजतात, त्यांना कमीपणा वाटतो, काहींना तर भीती सुद्धा वाटते. या गोष्टींचा फायदा परप्रांतीय उचलतात, जम्मू काश्मीर चा राज हिंदू होता. ही गोष्ट काही जणांना माहित असेल, आज काय परिस्थिती आहे..... काश्मीर मध्ये हिंदू शोधावे लागतील.आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आपला हक्क आहे का?
मित्रांनो आपली जमीन पिकती आहे. हे आपल्याला सिद्ध करून दाखवावे लागेल. नोकरी करण्यासाठी बाहेर गावी गेलेली माणसं परत फिरून येत नाहीत, ती तेथेच रमतात. आणि......... मला ओढा आहे मातृभूमीची, काही तरी करून दाखवण्याची. ने मजसी परत मातृ भूमीला या गाण्याच्या ओळी आठवतात.... नोकरीमुळे पाय बांधले गेले आहेत. मी तो क्षण शोधतोय तो सापडेल की नाही ते माहित नाही, परंतु प्रवास सुरू केला आहे. जे सोबतीला येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय.........
मित्रांनो एक विचार मांडत आहे. शिवप्रभूंनी सुद्धा स्वराज्याचा विचार मांडला होता. आपल्या खार विभागातील सर्व जनता, आया - बहिणी अबाल - वृद्ध समाधानाने नांदावीत ही मना पासून इच्छा आहे. संघटित होऊया, नाही तर काल तुमचा घात करील...... स्वकीयांना साथ द्या, परकियांच्या अमिषाला बळी पडू नका. इतिहास तुम्हाला विसरणार नाही. स्वार्थासाठी बेइमानी केली, तर माफ सुद्धा करणार नाही. दुसऱ्याच्या ताटा खालच मांजर बनून जगण्या पेक्षा एक दिवसासाठी वाघ बनून मेलेल बर ! हे बोलणं सोप आहे पण करण खूप कठीण आहे...... बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले......
धन्यवाद..
-संतोष शांताराम पाटील,
संगीत शिक्षक व प्रयोगशील उद्योजक, शेतकरी
पनवेल -नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा