मुंबई : शनिवार दि. २४ जानेवारी रोजी मुलुंड(प) येथील मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ प्रशालेत "भारतीय विज्ञान संशोधन संस्था मुंबई" या संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कृषी अभ्यासक आणि संशोधक मा. प्रकाश वसंत पेडणेकर यांना राष्ट्रीय कृषी सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
मा. श्री प्रकाश वसंत पेडणेकर हे कृषी क्षेत्रात गेली पाच दशकाहून काळ कार्यरत असून संस्थेच्या वैदिक वास्तु विषयक दुर्मिळ वनस्पती संशोधन कार्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विविध वनस्पतींचे सूक्ष्म गुणधर्म व उपयोगिता यांची विपुल माहिती मार्गदर्शन त्यांच्याकडून नियमित होत असते. आंबा लागवड व नियोजन यावर श्री पेडणेकर यांचा गाढा अभ्यास आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ वैदिक वास्तु प्रशिक्षक प्रा. डॉ. आनंदसर, ओरातज्ञ.डॉ. रानडे सर,मा.श्री प्रकाश गुप्ते, सौ. शरयू डोळस व इतर संस्था सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा