आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघामार्फत "पत्रकार दिन" उत्साहात साजरा ; रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५ ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार यांच्यासह, ५ उत्कृष्ट दिवाळी अंकाचे संपादक देखील सन्मानित!!

मुंबई (प्रतिनिधी):  महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे १९४ वा पत्रकार दिन दि. ६ जानेवारी रोजी  बी.आर. दंडवते सभागृह,करिरोड, मुंबई याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . सध्या संघाची २५ व्या वर्षाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. या रौप्य महोत्सवानिमित्त महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाने २५ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा व मान्यवरांचा पत्रकारितेतील पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट दिवाळी अंक यांची निवड करून पाच उत्कृष्ट दिवाळी अंकाच्या संपादकांचा मानसन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून मुंबईचे लाडके व्यक्तिमत्व व दोन वेळा नगरपाल असलेले मा. डॉ. जगन्नाथराव हेगडे ,ज्येष्ठ पत्रकार ,संपादक डॉ. सुकृत खांडेकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ जयश्रीताई संगीतराव ,संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर व संघाचे प्रमुख कार्यवाह अशोक भोसले हे उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच माजी संस्थापक अशोक तोडणकर आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ.मिनाक्षी सूर्यभान डोंगरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठी गीते सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष माननीय प्रकाश पाटकर साहेब यांनी केले. त्यानंतर पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दिनाचे गाऱ्हाणा शब्दश्री विलास देवळेकर यांनी आपल्या म्युझिकल इको साउंड सिस्टीम स्टाईल मध्ये सादर केली आणि त्यास सर्व उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला . उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार व पत्रकारितेतील पुरस्कार २०२६ या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी आपल्या भाषणात चांगली कामे करणे ही समाजाची गरज आहे.आपली संस्था अडचणीत आहे तरी संस्था चालवीत आहात याबद्दल संस्थेचे कौतुक केले व संघास दहा हजार रुपयाची देणगी जाहीर केली.ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख करून वृत्तपत्र लेखक जनजागृती करत असून समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. सध्या 194 वर्षात दोन हजार वृत्तपत्रांची संख्या झालेली आहे पण लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी झालेली आहे .अग्रलेख लिहिणारे संपादक मिळत नाहीत सध्या कॉपी-पेस्ट जर्नालिझम सुरू आहे .मुंबईत कॉपी-पेस्ट हेडिंग होतात हे लज्जास्पद आहे. वृत्तवाहिन्याना फक्त टीआरपी पाहिजे असतो याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली .आता ए.आय चा शिरकाव झालेला आहे तरीही आपण नाराज होऊ नका ,निराश होऊ नका ,खचू नका ,मोठी स्वप्न बघा, मानधनाची अपेक्षा करू नका ,आपली लेखणी चालू ठेवा असे आवाहन मा. डॉ. सुकृत खांडेकर यांनी उपस्थित पत्रकारांना केले. समाजसेविका व साहित्यिक जयश्रीताई संगीतराव यांनी साहित्यात पत्रकार नको पण पत्रकारांनी साहित्य जोपासले पाहिजे असे सांगताना लेखणी बोचणारी असावी तर टोचणारी नसावी असे स्पष्ट मत व्यक्त केले. पत्रकारांनी नागाच्या फण्यातून फुत्कारावे पण रक्त काढू नये,त्यातून धाक जरूर असावा असे आवर्जून सांगितले.
           मान्यवरांच्या हस्ते फेस कॉम चे मुंबईचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन्मानित माननीय सुरेश पोटे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक व समाजसेवक भाऊ सावंत तसेच राज्यातील दीडशे पुरस्कार मिळवणारे शशिकांत सावंत व लेखक, साहित्यिक डॉ.श्याम नाबर , ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट सोपान विठ्ठल बुडबाडकर , कृष्णा बाळू काजरोळकर, मा. मिलिंद काशीराम कदम ,भगवे वादळ चे संपादक मा. दत्ता श्रावण खंदारे ,प्राध्यापक,पत्रकार अभिनेता डॉक्टर संतोष लक्ष्‍मण सावंत, पत्रकार दिग्दर्शक कलाकार मा. महेश्वर भिकाजी तेटांबे जेष्ठ पत्रकार विजय विश्राम पंडित, लेखक ,कवी , ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ भीमजी तामोरे, डॉ.जय श्रीकांत ठाकूर ,मा. दिलीप वामन शेडगे, मा. सुनील महादेव कुवरे मा. अनिल पांडुरंग राऊत, मा. अण्णासाहेब एकनाथ आहेर ,मा. गजानन लक्ष्मण वीर ,मा. जगन्नाथ गोपाळ कामत ,मा. दिलीप नारायण दळवी ,मा. पंकज कुमार ध्रुव पाटील ,मा. राजाराम कृष्णा मयेकर, मा. अशोक परशुराम परब,मा. सौ. मीनाक्षी सूर्यभान डोंगरे या २५ उत्कृष्ट पत्रकारांचा आणि पाच उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी लोक निर्माण चे संपादक मा. बाळकृष्ण गोपाळ कासार, शूरसेनानी चे संपादक मा.संजय नारायण वेंगुर्लेकर , उल्हास प्रभात चे संपादक डॉ. गुरुनाथ पांडुरंग बनवते पोर्ट ट्रस्ट कामगार चे संपादक ॲड .एस के शेटे , उपसंपादक मारुती विश्वासराव कृषीराज या दिवाळी अंकाचे संपादक बाबुरावजी श्रीपती पाटील , दत्ता बर्गे यांचा शाल, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ.सूर्यभान डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन उत्तम व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.यासाठी संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार

मुंबई (शांताराम गुडेकर):  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...