आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न!

ठाणे : [ स्मिता भागणे ] - शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे शांतीनगर विद्यालय डोंबिवली यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 3 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते.सदर  कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय निर्मलाताई म्हात्रे उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्या सन्मा. माधुरीताई नित्यानंद घाटे- अध्यक्षा नंदकिशोर संस्कार केंद्र तसेच गोविंदा नंद श्रीराम मंदिर यांचे प्रेरक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
प्रमुख उपस्थिती सन्मा.कार्याध्यक्ष भूषण विजय म्हात्रे,मान.नगरसेवक महेश बाबुराव पाटील,मान. नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील, मान.संध्याताई उपाध्याय नंदकिशोर संस्कार केंद्राच्या कार्याध्यक्ष,पालक प्रतिनिधी तथा पत्रकार मान.स्मिताताई भागणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा माजी विद्यार्थी अभिजीत कुलकर्णी यांनी केले.
       यावेळी मुख्याध्यापिका सौ अलका अष्टेकर, संस्थेचे विश्वस्त पालक,कर्मचारी आणि आजी -माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, ईश स्तवन, स्वागत गीताद्वारे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ अष्टेकर मॅडम यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दरम्यान अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनीनी विविध कलाविष्कार, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थित मान्यवर,पालक वर शिक्षक वर्गाची मने जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई (सतीश पाटील) : लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त पनवेल ऊरण आगरी समाज मंडळातर्फे रक्तदान श...