आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

श्री.अंबाजी बदा लोभी यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

गडब (अवंतिका म्हात्रे): दि.३१/१२/२०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सावरसई येथे श्री.अंबाजी बदा लोभी यांचा प्रदीर्घ सेवा कालावधी नंतर शासनाच्या नियमित वयोमान नुसार सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजित पवार सर ,शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती. तेजस्विनी गलांडे मॅडम(पेण प्रकल्प अधिकारी) उपस्थित होत्या तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. मालू निरगुडे. पेण तालुका अध्यक्ष श्री. जोमा दरवडा,रायगड जिल्हा सचिव श्री. हरेश वीर व कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री.विश्वास वाघ तसेच कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री. मंगळ केवारी उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. समाजातील सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्प अधिकारी मॅडम यांनी त्यांचे मनोगत मांडताना श्री. अंबाजी बदा लोभी यांनी केल्या कामाचे कौतुक केले व पुढील दीर्घ आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित मान्यवरांनी व शिक्षक वृंदानी आपल्या जुन्या आठवणी सांगून आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच पेण तालुक्यातील सर्वच आश्रम शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पुणे, कर्जत, पिंगळास,पाथरज,उरण, वेरळ,नाशिक आदी ठिकाणचे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट शाळेला भेटवस्तू म्हणून सरस्वती मूर्ती देऊन करण्यात आली व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद, व कर्मचारी वृंद यांचे मनापासून आभार मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सन 2026 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ...