आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे येथे प्रसिद्ध कवि प्रदीप कासुर्डे सर यांच्या कवितेची निवड

मुंबई (प्रतिनिधी): दुसऱ्या आंतरराष्ट्रीय 'फुले फेस्टिवलचे आयोजन दिनांक २ जानेवारी ते ५ जानेवारी रोजी एस.एम.जोशी फौंडेशन पुणे येथे करण्यात आले आहे .देशातील पहिली मुलींची शाळा ज्या ऐतिहासिक वास्तूत सुरू झाली, त्या 'भिडेवाडा' स्मृतीला उजाळा देण्यासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्याचा,विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवणे आणि भारतीय संविधानाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या 'फुले फेस्टिवल'च्या आयोजनामागील मुख्य उद्देश असून या चार दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलचे आयोजक श्री. विजय वडवेराव यांनी अतिशय मेहनत घेऊन या महोत्सवाचे सुंदर नियोजन केले आहे.या महोत्सवाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ५ जानेवारी २०२६ रोजी एका भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
      यात महाराष्ट्र तसेच देशभरातील कवीची निवड करण्यात आली असून या कवीसंमेलनासाठी नवी मुंबईचे प्रसिद्ध कवि लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक प्रदीप कासुर्डे सर यांची निवड झाली आहे. प्रदीप कासुर्डे हे पुरोगामी आधुनिक विचाराची साहित्य निर्मिती करत असतात. ते कवितेतून फक्त शब्द मांडत नाहीत तर प्रत्यक्ष तसे कार्य करतात. एक आदर्श शिक्षक तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे.महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन ते समाजात विविध उपक्रम राबवत असतात.
      सावित्रीची गं पुण्याई, आदिमाता, खरी सावित्री, महात्मा ज्योतिबा या त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित लेख विविध वर्तमान पत्र व मासिके यात प्रसिद्ध झाले आहेत. शिक्षण संक्रमण मासिकात त्यांचा आधुनिक साहित्यिक सावित्रीबाई फुले हा लेख प्रसिद्ध झाला आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या समग्र कार्यावर प्रकाश टाकणारा साऊ पेटती मशाल हा त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम विविध शाळा, कॉलेज, संस्था यात सादर होत आहे. तसेच प्रदीप कासुर्डे सर यांची आधुनिक साहित्यिक सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले अखंड रचना ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन या मोठया संस्थेत ते कार्यरत असून या संस्थेद्वारे शालेय विद्यार्थी, शिक्षक, समाज,छात्रअध्यापक यामध्ये जिज्ञासा,आत्मविश्वास, नवनिर्मिती,वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे असून यासाठी विविध उपक्रम देशभर आयोजित केले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...