मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष व मान्यवर पाहूण्यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सम्मेलनाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांचे स्वागत व परिचय करून दिल्यावर अजित पराडकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी मयत झालेल्या ग्रामस्थांना श्रध्दांजली वाहण्यात आली.त्या नंतर शालांत, उच्च माध्यमिक व वैद्यकीय पदवीधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षांनी या कार्यक्रमागील उद्देश स्पष्ट करुन आपल्या ग्रामस्थांच्या मुलांनी सुद्धा युपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.
पाहुण्यांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धर्माजी पराडकर यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ, देणगीदार, पाहुणे व पदाधिकारी यांचे आभार मानले. महिलांचे हळदीकुंकू समारंभ पार पडल्यानंतर ग्रामस्थ पुरूष, महिला आणि मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम धनंजय मुणगेकर आणि गुणाजी पोसम यांनी आपल्या खास शैलीत सादर केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा