मुंबई (प्रतिनिधी): आयुर्वेद महाविद्यालय शीव, मुंबई येथे व बंटर भवन सभागृह कुर्ला पुर्व मुंबई येथे१९ व २० डिसेंबर २०२५ रोजी भारतातील आयुर्वेद डॉक्टरांचा दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात पार पडला.हा परिसंवाद आयुष मंत्रालय अंतर्गत एन.सी.आय.एस.एम. (NCISM) नवी दिल्ली, आयुष संचालक महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व एम सी.आय.एम, मुंबई यांच्या मान्यता व सहकार्यातून आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय शीव,मुंबई यांनी अग्निबोध National conference on ’Digestive Health Through Ayurveda' या विषयावर आयोजित केला होता.
या राष्ट्रीय परिसंवादाला देशभरातून ८९२ आयुर्वेद डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विषयातील अनुभवी व तज्ञ असे वक्ते या परिसंवादाला लाभले, द्रव्य गुण विभागातर्फे विविध औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.विविध नामवंत आयुर्वेदिक कंपन्यांनी या परिसंवादाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली परिसंवादाचे उद्घाटन सन्माननीय आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राकेश शर्मा माजी अध्यक्ष बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशन , डॉ. दिलीप वांगे सर MCIM प्रबंधक, आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननिय रणजीत पुराणिक सर, डॉ आशानंद सावंत सर व ईतर विश्वस्त आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविदास मोरे सर, परिसंवादाचे सचिव डॉ अरूण दूधमल सहसचिव डॉ .हेमंत पराडकर वइतर प्राध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भारतातील नामवंत आयुर्वेद तज्ञांनी यावेळी पाचनसंस्थेशी संबंधित विविध आजार, त्यांची कारणे व प्रभावी आयुर्वेदिक उपचार पद्धती यावर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
परिसंवादातील मार्गदर्शनामुळे उपस्थित डॉक्टरांच्या आयुर्वेद विषयक ज्ञानात निश्चितच भर पडली आहे. देशातील विविध राज्यांतून सहभागी झालेले हे ८९२ डॉक्टर येथे प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अधिक सक्षम व परिणामकारक सेवा देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.आयुर्वेदाच्या माध्यमातून भारताचे आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम होत असून, अशा राष्ट्रीय परिसंवादांमुळे जागतिक पातळीवर भारतातील आयुर्वेदाची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचा समारोप डॉ. सुनील फुगारे उपप्रबंधक अकॅडेमिक विभाग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या परिसंवादामध्ये १०० पेक्षा जास्त डॉक्टरांनी शोधनिबंध सादर केले त्यात डॉ सूर्यभान डोंगरे व इतर सन्माननीय प्राध्यापक यांनी परीक्षक म्हणून काम बघितले त्यातील उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या डॉक्टरांचा तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यां प्राध्यापकांचा तसेच अगदतंत्र (विष चिकित्सा ) विभाग प्रमुख डॉ सूर्यभान डोंगरे सर आयुर्वेद महाविद्यालय शीव मुंबई यांचा व इतर प्राध्यापक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आयुर्वेद महाविद्यालय शीव मुंबई येथील उपप्राचार्य , प्राध्यापक वर्ग ,पी .जी आणि यु जी आयुर्वेद विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग यांचा सहकार्याने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा