गडब(अवंतिका म्हात्रे): पेणमध्ये बिबट्या आज येईल.. बिबट्या उद्या येईल अशी दहशत ठिक ठिकाणी निर्माण झाली होती.मात्र प्रत्यक्षात कधी येईल याचा थांबपत्ता लागला नव्हता. आज दि. २७ डिसेंबर रोजी अखेर तो पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅक वर मृत अवस्थेत आढळला आहे. एकंदरीत पाहता असे दिसून येते आहे दृश्मी खारपाडा येथील रेल्वे ट्रॅकवर एका बिबट्याला रेल्वेने धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना ही रात्री घडली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत निष्कर्ष काढले असता असे दिसून येत आहे की येथील ग्रामस्थांना व नागरिकांना कधीही बिबट्याच दर्शन झालं नाही.मात्र आज बिबट्याचे मृताअवस्थेत दर्शन झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेकडे राज्यशासनाने, केंद्र शासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि या परिसरामध्ये बिबट्याचे दहशत निर्माण होणार नाही याकडे जातीने लक्ष द्यावे अशी नागरिकांनी आता मागणी केली आहे.. खारपाडा ग्रामस्थांशी हितगुज केले असता किंवा संपर्क साधला असता त्यांनी सदर रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत बिबट्या आढळल्याचे सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा