आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

अखंड वाचन यज्ञात आगरी बोली भाषेचा जागर!!

मुंबई (सतिश पाटील): कल्याण येथे अक्षरमंच सार्वजनिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड वाचन यज्ञ उपक्रमामध्ये ज्ञानदा वाचनालय कवी कट्टा व आगरी साहित्यशाला तर्फे ना.धो. महानोर काव्यवाचन सत्रात शनिवारी बालक मंदिर संस्था येथे आयोजित करण्यात आले होते. कल्याण येथील स.ग्रंथालय करुणा कल्याणकर ग्रंथसंपदा वाचनालय संपादिका संपदा दळवी व काव्य किरण मंडळ कार्याध्यक्षा स्वाती नातू, डॉ.शैलजा करोडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राचे संयोजन कवित्री व अश्विनी म्हात्रे यांनी केले आगरी साहित्य समूहचे प्रशासक जयंत पाटील साहित्यिक कुंडलिक म्हात्रे,आनंद भोईर, ऋतु राज पाटील,राजेंद्र पाटील, गिरीश म्हात्रे, वासुदेव फडके, चंद्रकांत पाटील,जयराम कराळे,विनोद कोळी,माधव गुरव, संस्कृती म्हात्रे अनन्या म्हात्रे यांनी आगरी बोलीतील कविता सादर केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...