आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे १३ डिसेंबर रोजी, स्वतंत्र कोकणराज्य अभियान संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात"कोकणरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री संजय कोकरे, जेष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर आणि मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कु्वेसकर उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमात कोकणातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना जगमान्य ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे तसेच महाराष्ट्र शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत तसेच वैभववाडी तालुका विकास संस्था संघटनेचे ते संस्थापक - अध्यक्ष आहेत, भारतीय ह्युमनराईट संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष आहेत तसेच साई एज्युकेअर ट्रेनिंग स्कूल या संस्थेचे संचालक आहेत. डॉ सुरेश पाटील यांचे "माय इंग्लिश ग्रामर बुक" नावाचे पुस्तक तसेच "फक्त तुझ्यासाठी" नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित झालेले आहेत. डॉ सुरेश पाटील यांच्या "कोकणरत्न" निवडीणे समाजातील सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...