आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

रायगडच्या खेळाडूंनी रचला इतिहास ;"सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगडच्या 15 शूटर यांची 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

गडब (अवंतिका म्हात्रे):  दिनांक 11 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान डॉक्टर. कर्णिसिंग शूटिंग रेंज दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय शूटिंग नेमबाजी स्पर्धे करिता सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब चे pistol , trap व डबल trap ह्या स्पर्धा संपन्न होणार आहेत.ह्या मध्ये वेदांत किशन खारके हा राष्ट्रीय नेमबाज 10 मीटर pistol व 25 मीटर स्पोर्ट्स pistol मध्ये, किशन खारके राष्ट्रीय नेमबाज हे 10 मीटर पिस्तूल, 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल, 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल व 50 मीटर फ्री पिस्तूल आणि 10 मीटर पिस्तूल मध्ये सुप्रिता सुबुद्धी आणि इंटरनॅशनल नेमबाज अवनी अलंकार कोळी Trap and Double Trap मध्ये महाराष्ट्र रायफल संघटनेने प्रतिनिधित्व करणार आहेत.
तसेच 68 वि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा भोपाळ मध्यप्रदेश येथे 11 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहेत ह्या स्पर्धेत 50 मीटर प्रोन रायफल मध्ये किरण रामचंद्र माळी कानसई अंबरनाथ, अजिंक्य भावे अलिबाग, गौरव जगदीश ठाकूर चिरनेर उरण,कुणाल पाटील जासई उरण,अथर्व काळे,नंदकुमार माने नवी मुंबई पोलीस, डाॅ.अनन्द कृष्णमृर्थी नवी मुंबई, सिमरजीतसिंग परमार मुंबई, सोहम जाधव,दिग्विजय चौगुले,पार्थ तोडकर श्रीवर्धन रायगड हे सर्व सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब चे नेमबाज महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षकअलंकार कोळी यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहेत. 
    ह्या होणाऱ्या स्पर्धे करिता क्लब चे अध्यक्ष विजय खारकर, सेक्रेटरी राष्ट्रीय नेमबाज, रायगड भुषण किशन खारके,प्रितम पाटील, महेश फुलोरे कानसई अंबरनाथ, अजिंक्य अर्जुन बुवा चौधरी , काटई डोंबिवली ,समाधान घोपरकर, अविनाश भगत, सुरज थळे,सागर भोईर ,प्रकाश दिसले,लिलेश भगत,संदेश पाटील, शैलेश पाटील, जगदीश पाटील,जयदास पाटील सुनील मढवी,राजु मुंबईकर,समीर आंबवने सर तसेच क्लब चे सर्व मेंबर्स मित्र परिवार यांनी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून आपल्या क्लब चे तसेच महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्पर्धेत अग्रेसर ठेवावेत ह्या शुभेच्छा दिल्यात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...