आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

जोगेश्वरीत आरोग्याविषयी जागरूकता अभियान

मुंबई (गणेश हिरवे) दिनांक ८नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क तर्फे “एक एहसास : आत्महत्याप्रतिबंधाबाबत जागरूकता” या उपक्रमांतर्गत आरजेएमडीएस इंग्लीश स्कुल जोगेश्वरी मधे मानसिक "आरोग्याविषयी जागरूकता" (Mental Health Awareness) सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कौन्सेलिंग सायकोलॉजिस्ट स्वेता रामकृष्ण सुखम मनस या उपक्रमाच्या संस्थापक यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी भावनिक जागरूकता, आत्मसंवाद आणि मानसिक संतुलन याबाबत अतिशय समजण्यासारख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्याध्यक्ष अशोक परब, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे सीईओ श्री दिपक खानविलकर, शाळेच्या कमिटी सदस्या इंद्रायणी सावंत, मुख्याध्यापिका डींपल मॅडम व शबनम मॅडम उपस्थित होते . या सत्राला क्लबच्या उपाध्यक्षा प्रज्ञा सिन्हा, सचिव समृद्धी जठार आणि क्लब सदस्य जय जगताप आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सन 2026 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ...