मुंबई |प्रतिनिधी : घाटकोपरमधील शिवसेना प्रभाग क्रमांक १६० चे कार्यकुशल मा. नगरसेवक श्री. किरणभाऊ लांडगे व त्यांचे सहकारी (भाऊ ग्रुप) यांनी वंदनीय हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात सहभागी झालेल्या रक्त दात्यांना उपयोगी भेटवस्तु व प्रमाणपत्र देण्यात आले. मुंबईतील सर्वच सार्वजनिक हाॅस्पीटल व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे हा उपक्रम राबवणे उचित असल्याचे प्रतिपादन लांडगे यांनी केले. शिबिराला महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी रक्तदात्यांचे मनोबल वाढवून शुभेच्छा दिल्या. प्रसंगी कला शिक्षक सुरेश जाधव सर , विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शाखेचे पाधिकारी , भाऊ ग्रुपचे सदस्य , शिवसैनिक उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सांडपाणी पाइपलाइनविरोधात गडब -खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक
जेसीबीने पाइपलाइन उखडली, पाइपलाइन वाद चिघळला ; सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार गडब (अवंतिका म्हात्रे):पेण ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा