आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

हेलपाटा ग्रुपची सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी / भिवंडी 
देणं लागतोय आपण समाजाचं... हे ब्रीदवाक्य घेऊन वॉट्सअप ग्रुप मधल्या 15 तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा हाती घेतला आहे. 
    हेलपाटा हा एक आगरी बोलतील ग्रामीण शब्द असून पर्यटन असा त्याचा एकंदरीत अर्थ होतो अशीच पर्यटनाची पायपीट करता करता समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा ज्या निदर्शनास पडतील त्यांना आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजेच हेलपाटा त्या अनुषंगाने आज भिवंडी ग्रामीण येथील श्रमिक शिक्षण मंडळ लाखीवली यांच्या जू नांदूरकी शाळेत पंखे देण्यात आले तसेच शाळेचा मुख्य प्रवेशद्वार मोडकळीस आला होता संस्थेच्या मागणीनुसार तो दुरुस्ती करुन देण्यात आला त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर असणाऱ्या सुमारे एक हजार मुलांचे अपघातापासून संरक्षण होईल असे तेथील संस्थेचे अध्यक्ष श्री मोरेश्वर पाटील यांनी सांगितले या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल हेलपाटा ग्रुपच्या सर्व सभासदांचे शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले यावेळी हेलपाटा ग्रुपचे जेष्ठ सदस्य दिगंबर दादा कवरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व हेलपाटा ग्रुपचे सदस्य सुप्रसिद्ध कवी संदेश भोईर यांनी बाबांची कविता सादर करुन वातावरण भावुक केले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला ह्या कार्यक्रमासाठी हेलपाटा ग्रुप चे सदस्य अंकित केणे, अनिल नाईक, दीपेश पिंपळास,शशिकांत पाटील, दीपेश भोईर, अमर कोळी, दीपेश साळुंके, आपला बंड्या, मनोज गोवारी, निलेश घोडे,योगेश भोईर, श्याम माळी, जय म्हात्रे,नितीन देसाई, नंदेश गावंड,भाऊ कारभारी आणि जेष्ठ सदस्य रामनाथ म्हात्रे यांनी मोलाचे योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....