आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ५ जुलै, २०२६

भांडुप (पश्चिम) सोनापूर परिसरात, एलबीएस (LBS) मार्गांवर जमिन खचली

मुंबई  : पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे आणि लगतच्या बांधकाम खोदकामामुळे रस्त्याचा काही भाग आणि फुटपाथ खचला आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही,विडीओ व फोटो मिडीयावर भरपूर व्हायरल झाले.मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.घटनेचे प्रमुख तपशील:स्थान: सोनापूर, एलबीएस मार्ग, भांडुप (पश्चिम).कारण: मुसळधार पाऊस आणि परिसरातील एका खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी केलेले खोदकाम (पिलिंगचे काम).नुकसान: रस्त्याचा आणि पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ खचला. एक टेम्पो खोल खड्ड्यात अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.जीवितहानी: कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
       दुसरी घटना मुलुंड मलबार हिल येथे महाराष्ट्र विद्युत मंडळ पावर हाऊसची भिंत कोसळून रिक्षाचे नुकसान झाले. सर्व निष्काळजी चालू आहे.पावसाळ्यात खरं तर कोणतेही खोदकामाला परवानगी नसते १जून पासून चार महीने पालिकेची खोद कामे बंद असतात. मग विकासकाला काय कायदे वेगळे असतात का? संबंधित अधिकारी, प्रशासन आणि प्रतिनिधी याला जबाबदार आहेत आपल्या विभागात येवढी मोठी दुर्घटना घडते आणि कोणीच त्या घटना स्थळाची पाहणी देखिल करायला पुढे आले नाहीत. येरवी फोटोशूट फार छान करतात एक झाड लावले तरी गाजावाजा केला जातो. जर मनुष्य हानी झाली असती तर सरकार कडून पाच लाख जाहीर करून आपली जबाबदारी पार केल्याचे दृश्य असते. ते ही तोंडीच त्यातपण नेहमीचा वेळकाढू पणा पण दुर्घटना घडू नये म्हणून उपाय योजना मुळीच नसते. त्याचे उदाहरण मुलुंड मधील मेट्रो प्रकल्प अपघात झाला जीवीत हानी झाली कारण दुर्लक्ष ठेकेदार कोण काय कामाचा अनुभव हे न तपासता कामे जवळच्या व्यक्तीला दिली जातात.आमचे पाचही बोटे तुपात कामाचा दर्जा कोण तपासणार? 
भ्रष्टाचार मुक्त ऐकून होता पत प्रत्येक्षात तो अधिकच वाढत आहे.सर्व टक्केवारीत विकास कामे होतात. खरं तर मुंबईत खूपच दाटीवाटी झाली आहे पण सरकार ला महसूल मिळतो ना! मग मुग गिळून गप्प बसायचं टोलेजंग इमारती ला परवानगी दिली जाते. त्याआधी रस्ते व भौगोलिक अभ्यास न करता विकासक आपली कामे करून मोकळे होतात. पाणी निचरा, झाडे तोड, नाले अरुंद करून जागा हडपणे,वाहन स्थळ व्यवस्था व रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामना सामान्य जनतेला करावा लागतो. अनेक त्रुटी असताना विकासक आपली कामे करून मोकळा होतो.तोपर्यंत सर्व कानाडोळा करून असतात सरकारी अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आधी येण्याजाण्याचा मार्ग तयार कधीच केला जात नाही दुर्दैव जनतेचे जर कोणी आवाज केला तर दडपशाही ने दबाव टाकून पोलीस वा जेल मध्ये डांबले जाते.ज्याची सत्ता त्याचे राज्य असेच चालू आहे देशात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

भांडुप (पश्चिम) सोनापूर परिसरात, एलबीएस (LBS) मार्गांवर जमिन खचली

मुंबई  : पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे आणि लगतच्या बांधकाम खोदकामामुळे रस्त्याचा काही भाग आणि फुटपाथ खचला आहे....