आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

कुसूरचा वाडिया जत्रोत्सव १८ नोव्हेंबर रोजी

वैभववाडी - तालुक्यातील कुसूर गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रामेश्वर आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असणारी श्री शक्ती दारूबाई यांचा वाडिया जत्रोत्सव यावर्षी मंगळवार, दिनांक १८ नोव्हेंबर आणि बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला हा वाडिया जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चतुर्दशी अमावास्येला साजरा होत असतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच मुंबई, पूणे, कोल्हापूर सोबतच गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि इतर राज्यांतील हजारों भाविक मोठ्या भक्तिभावाने सदर जत्रोत्सवात दरवर्षी हजेरी लावतात.
       कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे - मंगळवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी 'देवळातील वाडिया' संपन्न होतील, रात्री १० वाजता श्री देव रामेश्वर, शक्ती दारूबाई मंदिरात साळुंखे पाटील, सात हिस्सेदार मंडळींकडून पुजाअर्चा, देवीची ओटी भरणे, देवतांना नैवेद्य वाडी दाखवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तर बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. यावेळी माहेरवाशिणी लेकी आणि गावातील लेकी - सुना, देवी आई दारूबाईची ओटी भरून दर्शन घेतील. तरी भाविकांनी वाडिया जत्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुसूर ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: