आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

समाजसेविका अंजली सरकाळे यांना 'कोकण रत्न पदवी ' पुरस्कार जाहीर !!

मुंबई (प्रतिनिधी): अंध, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अतुलनीय कार्याची दखल; घेऊन अंजली सचिन सरकाळे यांना कोकण राज्य अभियान यांच्या वतीने नुकताच 'कोकण रत्न पदवीका २०२५ ' पुरस्कार जाहीर झाला.   अंध,दिव्यांग (अंध-अपंग) आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी गेल्या आठ वर्षांपासून समाजसेविका अंजली सरकाळे अनिर्वेध चारि्टेबल ट्रस्ट ही दिव्यांगांसाठी संस्था सुरु केली. त्यामध्ये पाचशेहून अधिक अंध दिव्यांग मेंबर्स आहेत.
      दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे कौशल्य विकास करणे.
  आरोग्य व शैक्षणिक समस्यांचे निराकरण: या बांधवांच्या आरोग्य आणि शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सक्रिय पुढाकार घेणे. विविध उपक्रमांचे आयोजन: अंध-दिव्यांगांसाठी स्पर्धा, मॅरेथॉन (Marathon) आणि वॉकथॉन (Walkathon) यांसारख्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणे. गरजू व्यक्तींना मदत नियमितपणे रेशन वाटप करणे आणि आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करणे.
         या सर्व जनसेवेच्या कार्याची दखल घेऊन अंजली सरकाळे यांना कोकण राज्य अभियान यांनी 'कोकण रत्न'पदवीका ' राज्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला.पुरस्कार वितरण सोहळा: १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई पत्रकार भवन फोर्ट येथे संपन्न होणार आहे, प्रमुख अतिथी - वरिष्ठ पत्रकार - सचिन कळझुणकर, आणि अध्यक्ष संजय कोंकरे उपस्थित रहाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....