मुंबई : अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशनच्या वतीने दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी शहा अँड अंकर कुटची इंजिनिअरिंग कॉलेज, चेंबूर येथे “प्लास्टिक कचरा व्यवस्थापन” (Plastic Waste Management)या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकशी संबंधित समस्या,प्लास्टिकचे सात प्रकार, 3R फॉर्म्युला (Reduce, Reuse, Recycle) तसेच प्लास्टिकला पर्याय या विषयांवर माहिती देण्यात आली.विविध हॅन्ड्स-ऑन ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या विषयातील संकल्पना समजून घेतल्या.या प्रसंगी प्रदीप कासुर्डे सर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला ३० विद्यार्थी तसेच प्रोफेसर धनंजय सर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा