आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग),येथील गरजू विद्यार्थ्यांनाशालेय साहित्य स्टील कपाटे , कंप्यूटर ट्रॉली, खुर्च्या इत्यादी साहित्य वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर)  चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), भक्तीसागर को. ऑप हौ. सोसा. बिल्डींग नं. ५, नवीन म्हाडा वसाहत, वाशीनाका, चेंबूर, मुंबई येथील गरजू विद्यार्थ्यांना पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब व गरजू मुलांना वहया, कंपासबॉक्स, स्केल, बिस्कीट, चॉकलेट, मॅगो फ्रुटी वाटप करण्यात आले. शिवाय स्टील दोन कपाटे , कंप्यूटर ट्रॉली, खुर्च्या इत्यादी साहित्य भेट म्हणून देण्यात आल्या.चित्रकला स्पर्धा, कथाकथन सुलेखन स्पर्धेचा बक्षिस समारंभ वितरणही करण्यात आला.
         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. संजय पेटकर साहेब महाप्रबंधक (सी.सी आणि सीएसआर आरसीएफ ),विशेष पाहुणे म्हणून मा. श्री.पराग दांडेकर साहेब उपमहाव्यवस्थापक, आर.सी.एफ.लि. चेंबूर,श्री.विठ्ठल खरटमोल - मा नगरसेवक ,मा.डॉ.रजनीश कुमार साहेब मॅनेजर( आर.सी. एफ लि. चेंबूर मा.श्री.धनंजय खामकर साहेब (सल्लागार - आर.सी.एफ.लि. चेंबूर),मा. श्री. संतोष शिकतोडे साहेब (उप अभियंता, नवी मुंबई महानगर पालिका), श्री.भालचंद्र पाटे अध्यक्ष (मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ),
मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा उजाले आदी मान्यवर उपस्थित होते 
    प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करताना म्हणाले की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास लगेच समजते,आकलन होते.अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले, त्यांचे पुढे काही अडले नाही; त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमाच्याशाळांतून शिकवावे असे त्यांनी प्रतिपादन केले.
       याप्रसंगी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड उपस्थित होते. पंचरत्न मित्र मंडळाने नेहमीच समाजातील दुर्बल घटक सांठी विशेष तत्पर राहून मोठे योगदान दिले आहे .शैक्षणिक संस्थांसाठी मदत कार्यात मोठी आघाडी घेतली असून या शाळेतील मुलामुलींनीही शिकून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाज ऋणातून उतराई व्हावे असे आवाहन केले.सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी केले . कार्यक्रम संपन्न करण्यासाठी वैभव घरत ,श्री सचिन साळुंखे ,श्री प्रकाश भोसले (मॅनेजर सारस्वत बँक) , स्नेहा नानीवडेकर ,डीएम मिश्रा , प्रकाश शेजवळ , विलास कुंभार ,श्री तुकाराम वने मॅथ्यू डिसोजा आदींनी सांभाळली . भेटवस्तू मिळाल्याने लहान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...