आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. २०३ आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभेचे आमदार  अजय चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक अक्षय पवार –अन्न हे पूर्णब्रह्म सुधाम भुवन  ,द्वितीय क्रमांक पारितोषिक सचिन मणियार – चाळ संस्कृती आणि सण– कृष्ण नगर, जेठाबाई  
तसेच तृतीय क्रमांक पारितोषिक प्रकाश पडवळ – गुंफा शंकर पिंड, त्रिवेणी सदन  यांना  जाहीर झाले. तर  प्रथम उत्तेजनार्थ – जागृती काले  - शहराचा दिखावा,  महालक्ष्मी व दुसरे उत्तेजनार्थ पारितोषिक – निखिल साळसकर :  जगन्नाथ,वाखाणी हाऊस  यांना जाहीर झाले.सुबक मूर्ती साठी विशेष उल्लेख म्हणून– शंभो कांबळे : शंकर तांडव, श्रमिक निवास यांची निवड झाली.
   या स्पर्धेत एकूण १८३ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या उपक्रमाला शिवसेना सचिव  सुधीर साळवी आणि विभागप्रमुख  अशिष चेंबुरकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपविभागप्रमुख  गजानन चव्हाण व  पराग चव्हाण, शाखाप्रमुख मिनार नाताळकर, शाखा संघटिका भारती पेडणेकर, शाखा समन्वयक दिव्या बडवे यांच्या सहकार्याने, परळची देवी मंडळाचे कार्याध्यक्ष  राजन म्हाडगुत आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश धाऊसकर यांच्या प्रमुख आयोजनाखाली हा उपक्रम पार पडला.  
   उपशाखाप्रमुख ज्ञानेश शिर्के आणि राजेश परब, तसेच अनिकेत तुलसकर, मंगेश जगताप आणि प्रमोद मुळदेकर यांच्या कार्यतत्पर योगदानातून या स्पर्धेला भक्कम यश मिळाले.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कु. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर !!

 मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरातील साहित्यिक, फिल्म मेकर, सा.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना भारत...