आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

विसर्जनावेळी “श्री स्वामी समर्थ कट्टा ” परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले. चिंचपोकळी पश्चिम येथील,आर्थर रोड परिसरातून मुंबईतील सर्व नामांकित गणेश मुर्त्या, चौपाट्टी येथे विसर्जनासाठी जातात. गणेश दर्शन साठी मुंबई,वाशी, विरार, ठाणे, अंबरनाथ परिसरातून हजारो गणेशभक्त आपल्या परिवारासह दर्शना साठी येतात. त्यांच्या साठी ही सोय करण्यात आली होती. याचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला.
       श्री स्वामी कट्टा परिवाराचे अध्यक्ष - आनंद पेवकर, कोषाध्यक्ष - रवींद्र रेवडेकर, नंदू गावडे, सल्लागार - भास्कर साळुंके, माजी अध्यक्ष - बाळ पंडित, विशाल मेस्त्री, नरेश पाटील, मनिषा सावंत, नीलम देवधरे, स्वाती रेवडेकर, मनिषा शिरसेकर, अंकिता पेवकर, व जयश्री सावंत यांनी फारच मेहनत घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिन साजरा

मुंबई( प्रतिनिधी ) सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे मुंबई येथे नुकताच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्...