मुंबई: अक्षरशिल्प पिमास प्रायव्हेट लिमिटेड यांचेमार्फत अॅबॅकस आणि मानसिक अंकगणित पामा इंडीया प्रादेशिक स्पर्धेचे भव्य आयोजन शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये घणसोली येथील अक्षरदिप क्रिएशन्समधील ४५ मुलांनी सहभाग घेत प्राविण्य मिळवले व विविध गटांमध्ये पारितोषिके पटकावली. मुलांमध्ये मनाची क्षमता वृध्दी व्हावी तसेच मेंदूला चालना मिळावी हया उददेशाने आयोजित करण्यात येणा-या अबॅकस व मानसिक गणना स्पर्धांमुळे त्यांची गणितातील आवड वृध्दींगत होऊन मुले आकडेमोडीमध्ये पारंगत होतात व त्याचा मोठा फायदा त्यांना शालेय अभ्यासामध्येदेखील होतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशा स्पर्धांमुळे विदयार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे अक्षरदिपच्या संचालिका स्वाती भाकले यांनी स्पष्ट केले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास व स्मरणशक्ती बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अक्षरशिल्प पिमास संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या हया स्पर्धांमध्ये अक्षरदीपची मुले मोठया संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकत असल्याचे सौ. भाकले यांनी सांगितले. पामा इंडीयासारख्या नावाजलेल्या स्पर्धांमधील अक्षरदीपमधील विदयार्थ्यांच्या चमकदार कामगिरीसाठी विदयार्थी व पालकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा