आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

जोगेश्वरीत उलगडला संभाजी महाराजांचा इतिहास

मुंबई प्रतिनिधी (गणेश हिरवे):उत्तर पश्चिम जिल्हा खासदार अर्बन डेव्हलपमेंट ऑफ इंडिया सदस्य रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या पत्नी मनीषा वायकर समाजसेविका यांच्या सहकार्याने जोगेश्वरी मध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचा संपूर्ण केलेला त्याग व तो प्रत्यक्षात जोगेश्वरी मध्ये उतरवण्याचे प्रचंड ताकतीचे काम व या कली युगात ज्याची गरज लागते ते बरोबर हेरून आपल्या दूरदृष्टीने खासदार यांनी प्रत्यक्षात कृतीत आणले आहे असे काम महाराष्ट्रात कोणी कोठे आणले असेल तर ते माझ्या तरी लक्षात नाही एकनिष्ठा ताकद प्रामाणिकपणा आपल्या धर्माबद्दल चा आदर लोकांबद्दलचा आदर याचे प्रत्यक्ष उदाहरण मांडण्यात आले धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे काय होते हे सगळ्याला वाचून त्यांचा इतिहास माहित आहे. पण तो इतिहास आचरणात आणण्याचे काम या युगातील व या देशातील महाराष्ट्रातील जनता करत नाही व हे काम त्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात 24 तास राहावे व त्यांचा आचरण करून आपलं आयुष्य सोनेरी करावं अशा प्रकारची कल्पना महाराष्ट्रातील शिवछत्रपतीच्या एका मावळ्याने आपली जबाबदारी ओळखून ती पुरी केली आहे.
        या जबाबदारीला जोगेश्वरी मुंबई महाराष्ट्र हिंदुस्तान या सर्व जनतेने दात दिली पाहिजे.प्रत्यक्ष मराठी मराठी मराठी यांनी पक्षाचा विचार न करता अशा कृत्या आपल्यासाठी जो करतो त्याचा व धर्मवीर संभाजी महाराजयांचा केलेले कामाचा विचार करून त्याप्रमाणे वागावे त्याचा आदर करावा ही काळाची गरज आहे अत्यंत अत्यंत अत्यंत काळाची गरज आहे आणि ती गरज छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा मराठी माणूस रविंद्र दत्ताराम वायकरयांनी करून दाखवलेली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये २ नोव्हेंबरला पायी दिंडी सोहळा

मुंबई (प्रतिनिधी) - संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित वर्ष १२ वे सर्व भाविकांचे आराध्य दैवत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी ...