गडब ( अवंतिका म्हात्रे) दिनांक 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान 12 वी वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिप 2025 भोपाळ मध्यप्रदेश तर दिनांक 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025 12 वी वेस्ट झोन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2025 गोवा येथे संपन्न झाली. भोपाळ येथे झालेल्या ट्रॅप शूटिंग मध्ये अवनी कोळी दिघोडे उरण ला जुनिअर व युथ ट्रॅप शॉटगन (रायफल )मध्ये दुहेरी सिल्वर मेडल तसेच वरा देवळेकर आणि कार्तिकी देवककर हता भगिनींना डबल ट्रॅप शॉटगन मध्ये जुनिअर सिल्वर व ब्रॉन्झ पदकाची कमाई करत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरीता ह्या तिघींची निवड झाली तसेंच गोवा येथे झालेल्या 12 व्या वेस्ट झोन 50 मिटर रायफल प्रोन स्पर्धेत नंदकुमार माने नवी मुंबई पोलीस पुरुष गट व कुणाल पाटील जासई उरण युथ गट आणि 25 मिटर स्टॅंडर्ड पिस्टल मध्ये निर्णायक गुण संपादन करत मास्टर मध्ये एकमेव निवड ह्या स्पर्धेत किशन खारके नेरे ह्यांची झालीआत्ता हे सर्व स्पर्धक राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे करीता पात्र होऊन महाराष्ट्र रायफल संघटने चे प्रतिनिधित्व दिल्ली येथे करणार आहेत हे सर्व स्पर्धक सिद्धांत रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लब चे नेमबाज आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल क्लब चे अध्यक्ष विजय खारकर, सेक्रेटरी, रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक किशन खारके, राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक अलंकार कोळी,राल्स्टन कोएलो issf कोच,क्लब चे सदस्य महेश फुलोरे अंबरनाथ, अजिंक्य चौधरी डोंबिवली, समाधान घोपरकर, अविनाश भगत, सुरज थळे, प्रकाश दिसले, किरण मोहिते, निलेश भगत, संदेश पाटील, राजू मुंबईकर, सुनील मढवी, समीर अंबवणे व मित्र परिवार ह्यांनी पुढील होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकारिता अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा