आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

|| श्राध्दः ||

भाद्रपद कृष्ण मासी महालयारंभ निकट येती,
पितरांच्या श्राध्दासाठी सर्वच तयार असती;
मरणतिथीला आप्तेंष्ठांचे स्मरण पितरही करती,
तेव्हा आप्तेष्ट पितरांसाठी श्रध्देने श्राध्द करती।।१।।
              
श्राध्द कर्मात श्रध्दा विशेष असती,
पंचपक्वांन्न हे दुय्यम स्थानावरती;
पितृतर्पण,ऋषितर्पण जे श्रध्देने करती,
पितृदोषातून त्यांना मुक्ती मिळती।।२।। 

'श्रध्दया क्रियते यत्तत् श्राध्दम् 'शास्त्र सांगती,
श्रेष्ठ पितरांची महती वेद,उपनिषद गाती;
पितृणामर्यमा चास्मि..असे गीता वर्णन करती,
श्राध्द कर्माचं बंधन हिंदु धर्म मानीती।।३।। 

पिता,पितामह,प्रपितामह प्रतिनिधीत्मक उच्चार करती,
वसुगण,रुद्रगण,आदित्यगणात त्यांची गणना होती;
शास्त्रोक्त श्राध्दादि कर्मात तिन्ही पिढींना तर्पण होती,
म्हणून हिंदु धर्मात श्राध्द कर्माला पूण्यकर्म म्हणती।।४।।
        
शास्त्रात श्राध्दाचे विविध प्रकार समजावती,
जे सपिंडश्राध्द करण्यास असमर्थ असती,
ते ब्रम्हार्पण श्राद्ध व हस्त श्राध्द करती; 
त्यांच्या असंभवतेत आम व हिरण्यश्राध्द करती।।५।।
    
श्राध्दात्मक कर्माचे फळ घरात सुख-शांती वसती,
देवतांची व पितरांची कृपा घरावरती बरसती;
श्राध्द करण्याचे समाधानही जनमनास मिळती,
पितृ,ऋषि व देवऋणांतून मानव विमुक्त होती।।६।
+++++++++++++++++++++++
शब्दांकनःश्री.नवनाथ एकनाथ ठाकुर(खिडकाळी-ठाणे)
+++++++++++++++++++++++
         
            👉 शब्दार्थः
*महालयारंभ-   भाद्रपद कृ.प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या (सर्वपित्री अमावस्या) पर्यंतचा कालावधी.
*पितृतर्पण,ऋषितर्पण-   पित्याला,ऋषिंना तृप्त करणे,संतुष्ट करणे.
*पितृदोष-    अश्रध्दामय अकर्म केल्यावर,पितरांच्या असंतुष्टीमुळे पितृदोष लागतो.
*श्रध्दया क्रियते..-  श्रध्देने केले जाते त्याला श्राध्द म्हणतात.
*पितृणामर्यमा चास्मि....-  "पितरांमध्ये अर्यमा देवता मी आहे."असे योगेश्वर भगवान गीतेमध्ये विभुतीयोग नामक १० व्या अध्यायात २९ व्या श्लोकात वर्णन करतात.
*वसुगण,रुद्रगण,आदित्यगण-   ज्याला उद्देशून श्राध्द करतो.त्याची वसुगणात गणना होते.त्याच्या पित्याची रुद्रगणात तर आजोबाची आदित्यगणात गणना होते.अष्टवसु,एकादशरुद्र आणि द्वादश आदित्य अशा एकूण एकतीस देवता आहेत.
*सपिंड श्राध्द-   ब्राह्मणांच्या भोजनोत्तर पिंडपूजा करून केलेले श्राध्द.
*ब्रह्मार्पण-  ब्रह्मास अर्पण करण्याच्या बुध्दिने केलेले पिंडरहित श्राध्द.
*हस्तश्राध्द-  शिजलेल्या अन्नाने  करण्यात येणारे श्राध्द.
*आमश्राध्द-  फक्त शिधा देऊन केलेले श्राध्द.
*हिरण्यश्राध्द-  केवळ दक्षिणा देऊन केलेले श्राध्द,
+++++++++++++++++++++++

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...