आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

अजित वैद्य यांना समाजभूषण पुरस्कार

मुंबई  (गणेश हिरवे)जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभीर शाळेचे माजी विद्यार्थी अजित वैद्य यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा सन २०२४ चा समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले आहे.अजित शाळेत अभ्यासात हुशार होतेच पण आताही त्यांचे समाजकार्य नेहमीच नियमित सुरूच असतें.आजपर्यंत त्यांनी हजारो गोर गरीब वंचित विद्यार्थी, वृध्द लोक, अनाथालय, आश्रमशाळा यांना वस्तू रूपाने आणि अन्नधान्य स्वरूपात मदत पोहचवलेली आहे.कोणत्याही गोष्टीचा बडेजवपणा नसून शांततेत आपले समाजकार्य ते नियमित करीत असतात आणि त्यांची हाच गुण वाखाणण्यासारखा असल्याचे हिरवे सांगतात.वैद्य यांना पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...