आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

मानाचे नवक्षितिज पुरस्कार जाहीर

मुंबई :( सुनिल इंगळे )नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा " नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ची घोषणा निवड समिती अध्यक्ष समाजसेवक तथा जेष्ठ वकील उच्च न्यायलय जगदीश जायले, समाजसेवक व संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश कोडविलकर, जेष्ठ पत्रकार मनोहर कुभेजकर यांनी केली.
      लोककला अकॅडमीचे गणेश चंदनशिवे, कुसुमताई आलम गडचिरोली (सामाजिक क्षेत्र),प्रतिष्ठा काळे यवतमाळ ((सामाजिक क्षेत्र ),के. आर. बजाज नागपूर (प्रशासकीय क्षेत्र),डॉ महेश अभ्यंकर मुंबई (आरोग्य व वैद्यकीय शिक्षण),हर्षदा विजय घोले मुंबई(क्रीडा क्षेत्र), रमेश होतवानी नागपूर (प्रशासकीय क्षेत्र),अशोक द्वारकादास जसवानी,बुलढाणा(पत्रकारिता क्षेत्र ),विजय रतन गायकवाड मुंबई ( आरोग्य क्षेत्र),रविंद्र रामू देडिये मुंबई (सामाजिक क्षेत्र ),गणेश हिरवे मुंबई (सामाजिक क्षेत्र),प्रतीक्षा प्रमोद शेलार मुंबई ( क्रीडा क्षेत्र),धनंजय बाबूराव पवार मुंबई ( सामाजिक क्षेत्र),ऋतुजा भालचंद्र देवकर मुंबई (क्रीडा ),महेश सोनवले मुंबई ( शैक्षणिक क्षेत्र),सुषमा कुर्ले मुंबई (उद्योग क्षेत्र)
   अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे सचिव धर्मराज तोकला यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे ही माहिती दिली.एकूण १४७ प्रस्ताव आले होते, त्यातून महाराष्ट्रातील निवडक १६ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत १९ जानेवारी २०२५ रोजी भानुबेन कलाघर नंदादीप हायस्कुल गोरेगाव पूर्व मुंबई येथे संपन्न होणार असल्याचे सुनिल कुमरे व धर्मराज तोकला यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...