आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

मंगेश चिवटे, गजानन तुपे यांच्यासह भीमराव धुळप,कविता राम यांना प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड जाहीर

मुंबई(शांताराम गुडेकर ) स्पंदन एक्सप्रेस व चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'प्राईड ऑफ स्पंदन' पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी हा पुरस्कार दैनिक महासागर मुंबईचे मुख्य वृत्तसंपादक, साहित्यिक, गझलकार गजानन तुपे, प्रख्यात पार्श्वगायिका कविता राम तसेच धगधगती मुंबईचे संपादक, महाराष्ट्र शासन पत्रकार, विशेष कार्यकारी अधिकारी भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप आणि रुग्णसेवेत सतत कार्यरत असलेले, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी,कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
      शनिवार२१ डिसेंबर २०२४ रोजी कराड येथे भव्य दिव्य कार्यक्रमात हा प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार श्री धुळप यांना देण्यात येणार आहे. 
श्री धुळप यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या अगोदर देखील अनेक पुरस्कार मिळालेले असून हा त्यांचा २१ वा पुरस्कार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यासह सर्व पुरस्कार मिळवणाऱ्या मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"मराठमोळं मुलुंड" संस्थेचा ११ वा वर्धापन ; स्वर झंकार” मराठी- हिंदी संगीत संध्या" कार्यक्रमाचे आयोजन व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा होणार सन्मान !

मुंबई: "मराठमोळं मुलुंड" संस्थेचा ११ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक १३ सप्टेंबर  रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत म...